AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Day Celebration 2026 : ‘जय जय महाराष्ट्र माझा..’ राज्यभरात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

आज १ मे, महाराष्ट्र दिन राज्यभरात उत्साहात साजरा झाला. भाषावार प्रांतरचनेतून १९६० साली मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती झाली. नंदुरबार, गोंदिया, जळगाव, जालना, सातारा, मालेगाव यासह अनेक जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री व इतर मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. विविध क्षेत्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करून हा ऐतिहासिक दिवस साजरा करण्यात आला.

Maharashtra Day Celebration 2026 : 'जय जय महाराष्ट्र माझा..' राज्यभरात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
| Updated on: May 01, 2026 | 1:54 PM
Share

आज 1 मे, महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा दिवस. महाराष्ट्रासाठी हा दिवस खूप खास. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावार प्रांतरचनेसाठी लोकांकडून आग्रह धरण्यात आला.महाराष्ट्रातही मुंबईसह वेगळ्या महाराष्ट्राची निर्मिती झालीच पाहिजे, अशी मागणी केली जात होती. मराठी जनतेच्या लढ्यापुढे केंद्र सरकारने नमतं घेतलं आणि अखेर 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. म्हणून आजचा दिवस हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही आजचा दिवस उत्साहात साजरा झाला. विविध शहर, जिल्ह्यात, ध्वजारोहण करून, हा महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.

वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण

महाराष्ट्राचा 66 वा वर्धापन दिन नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पोलीस कवायत मैदानावर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, पोलीस दलाच्या वतीने पथसंचलन करत मानवंदना देण्यात आली, जिल्ह्यातील अनेक विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचारी आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या जिल्हाधिकारी मित्तली सेठी यांच्या पालकमंत्री च्या हस्ते सत्कार करण्यात आला. राज्यात यावर्षी उन्हाचा तडाखा अधिक असल्याने आणि सरासरी पेक्षा पाऊस कमी पडणार असल्याने राज्य शासन पाणीटंचाई यासाठी प्रयत्न करणार तर दुसरीकडे खरीप हंगामासाठी लागणारे खत बियाणे हे देखील वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

नंदुरबार जिल्हा हा उत्कृष्ट जिल्हा असून या जिल्ह्यात अनेक सुविधा करण्यासाठी मोठा वाव आहे त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यात विकासाच्या भरभराटी आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुभेच्छा देताना सांगितलं. पोलीस दलातील महसूल क्रीडा कृषी या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना सन्मानचिन्ह आणि बक्षीस पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्रदिनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते गोंदियात ध्वजारोहण

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त आज गोंदिया येथील कारंजा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडला यावेळी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गोंदियात आमदार विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा व्यक्तींचा तसेच पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

जळगाव – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

जळगावात महाराष्ट्र दिनानिमित्ताने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. जिल्हा पोलीस दलातील 27 कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी यासह विविध शासकीय विभागातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देखील गौरव करण्यात आला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते स्व जनगणना मोहिमेचा देखील शुभारंभ झाला. महाराष्ट्र दिनानिमित्ताने राज्यातील सर्व जनतेला मंत्री गुलाबराव पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र दिनानिमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्ताने आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व गाभाऱ्यात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. जावटीमुळे श्रींचा गाभारा मनमोहक व आकर्षक दिसत आहे. शेवंती, जरबेरा, झेंडू, गुलाब, रॉकेट, ब्लू डीजी इत्यादी दोन टन फुलांचा वापर करण्यात आला.

जालना – पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज जालन्याच्या पोलीस कवायत मैदानावर राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री तथा जालनाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी काँग्रेसचे खासदार कल्याण काळे आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह जिल्हाधिकारी तसेच जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा हा सातत्याने वाढत असून सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी असे देखील आवाहन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सर्व नागरिकांना केलं. तसेच त्यांनी सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

छत्रपती शाहू स्टेडियमवर महाराष्ट्र दिनानिमित्त पालकाचे शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण

महाराष्ट्र दिनानिमित्त आज छत्रपती शाहू स्टेडियम येथे सातारयाचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर सातारा पोलीस दलाच्या वतीने परेड संचलन करण्यात आले या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण

मालेगावात कामगार दिन, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. मालेगाव शहरात महसूल कार्यालय आवारात ध्वजारोहण पार पडलं. ध्वजारोहणाच्या निमित्ताने अपर जिल्हाधिकारी, अपर पोलीस अधीक्षक यांच्यासह सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी कामगार दिनाच्या निमित्ताने कामगारांना देखील साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी भुसे यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.

Follow Us
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला.
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून ठिकठिकाणी ध्वजारोहण करत....
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून ठिकठिकाणी ध्वजारोहण करत.....
एअरबॅगमुळे भाजप खासदार सावरांचा थोडक्यात जीव वाचला, घोडबंदर रोडवर भीषण
एअरबॅगमुळे भाजप खासदार सावरांचा थोडक्यात जीव वाचला, घोडबंदर रोडवर भीषण.
नंदनवनवर भेट, राजकारणात खळबळ, परांजपे शिंदे गटाच्या वाटेवर?
नंदनवनवर भेट, राजकारणात खळबळ, परांजपे शिंदे गटाच्या वाटेवर?.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हुतात्मा स्मारकास अभिवादन
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हुतात्मा स्मारकास अभिवादन.
थरकाप उडवणारा घटनाक्रम, टँकरचा भीषण अपघात, विरार पश्चिमेला जोडणाऱ्या प
थरकाप उडवणारा घटनाक्रम, टँकरचा भीषण अपघात, विरार पश्चिमेला जोडणाऱ्या प.
ठाकरेंचा दगाबाजी करायचा संकल्प, पण संधी मिळाली नाही; भाजप नेत्याचं...
ठाकरेंचा दगाबाजी करायचा संकल्प, पण संधी मिळाली नाही; भाजप नेत्याचं....