AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण, तब्बल 6 हजारांच्या किंमती घटवल्या, नवीन किंमत काय?

ठाण्यात ६२४८ म्हाडा घरांच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. ही घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) आहेत. शिरगाव आणि खोणी येथील या घरांची किंमत प्रति युनिट १ लाख ते १ लाख ४३ हजारांनी कमी करण्यात आली आहे.

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण, तब्बल 6 हजारांच्या किंमती घटवल्या, नवीन किंमत काय?
| Updated on: Jun 24, 2025 | 1:33 PM
Share

आपल्या हक्काचे घर हवं, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण अनेकदा घरांच्या किंमतीमुळे प्रत्येकाला ते घेणं परवडत नाही. पण आता मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडणारे घर घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. म्हाडा सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या किंमतीत घर उपलब्ध करून देत आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाण्यातील तब्बल ६ हजारांहून अधिक घरांच्या किंमतीत घट करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणांतर्गत (MHADA) येणाऱ्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने ठाणे जिल्ह्यातील ६,२४८ घरांच्या किंमतीत घट करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक (EWS) घटकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान आवास योजना (शहरी) अंतर्गत कल्याणमधील शिरगाव आणि खोणी गावांमध्ये ही घरे आहेत. आता ही घरं ‘पहिले येईल त्याला प्राधान्य’ या तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत.

किंमत कपातीला मंजुरी

कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकवाड यांनी सांगितले की, ही किंमत कपात EWS वर्गातील रहिवाशांना घर घेण्यास मदत करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांनी त्वरित अर्ज करावा, असे आवाहनही त्यांनी केले. म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी या किंमत कपातीला मंजुरी दिली आहे.

कशी असणार नवी किंमत?

ठाण्यातील शिरगावमधील ५ हजार २३६ घरांच्या किमतीत प्रति युनिट १ लाख ४३ हजार ४०४ रुपयाने कपात करण्यात आली आहे. त्यामुळे घराची मूळ किंमत २० लाख ७२ हजार १४६ वरुन आता ती १९ लाख २८ हजार ७४२ इतकी झाली आहे. तर खोणीतील १ हजार ०१२ घरांच्या किमतीत प्रति युनिट १ लाख ०१ हजार ८०० ने कपात करण्यात आली आहे. त्यामुळे या घरांची मूळ किंमत २० लाख १३ हजार ५०० वरून आता ती १९ लाख ११ हजार ७०० इतकी झाली आहे. या किमती कमी झाल्याने अनेक EWS कुटुंबांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करणे सोपे होईल.

अडीच हजारांची लॉटरी काढणार

दरम्यान येत्या जुलै महिन्यात चार हजार घरांची लॉटरी म्हाडा जाहीर करणार आहे. यात चितळसर येथे हाऊसिंग स्टॉकमधून उभारलेल्या 1173 घरांचा समावेश आहे. तर कल्याणमध्येही म्हाडा अडीच हजारांची लॉटरी काढणार आहे. म्हाडाची सर्वाधिक घरे ठाणे आणि कल्याणमध्ये राहणार आहेत. यंदा 2025-2026 च्या अर्थसंकल्पात ‘म्हाडा’च्या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत एकूण 19 हजार 497 सदनिकांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

तसेच म्हाडाकडून मुंबई मंडळात पाच हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. ही लॉटरी दिवाळीपूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात म्हाडाने राज्यात 19 हजार 496 घरांच्या बांधकामाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यापैकी 5199 घरे बांधण्यात येणार आहेत. याशिवाय पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण मंडळांमध्येही घरांची कामे सुरु आहेत.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.