“पुरावे नसल्याने शरद पवार यांनीदेखील घुमजाव केला”; भीमा कोरेगाव प्रकरणात या नेत्याचं स्पष्टीकरण

ज्या मिलिंद एकबोटे यांचे नाव भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी घेतले जात होते, त्या प्रकरणी आता मिलिंद एकबोटे यांनीच मोठा खुलासा केला आहे.

पुरावे नसल्याने शरद पवार यांनीदेखील घुमजाव केला; भीमा कोरेगाव प्रकरणात या नेत्याचं स्पष्टीकरण
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 7:27 PM

अहमदनगर : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर पु्ण्यात एट्रॉसिटी आणि दंगल भडकावणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणी अनेक मतभेद नोंदवले गेले होते. तर आता पुन्हा एकदा समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी मोठा खुलासा केला आहे. याबाबत बोलताना मिलिंद एकबोटे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्या संदर्भाताली दावा दाखल करण्यासंदर्भात मी वकिलांकडे आग्रह करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणात आपल्याला विनाकारण गोवलं गेलं आहे असं सांगत हिंदुत्वाचे प्रामाणिक काम केले तर त्याला बदनाम सम करायचं हेच या प्रकरणावरून स्पष्टपणे दिसत असल्याची गंभीर टीका मिलिंद एकबोटे यांनी केली आहे. या प्रकरणामध्ये माझा काहीही संबंध नव्हता असंही त्यांनी यावेळी सांगितले.

आपण करत असलेल्या कामाविषयी बोलताना मिलिंद एकबोटे यांनी सांगितले की, मी गेल्या 35 वर्षांपासून क्रांतिवीर लहुजी वस्ताद प्रतिष्ठानच्या माध्यमातून दलितांच्या उन्नतीचे काम करतो आहे.

त्यांच्याबाबत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून माझे काम सुरु आहे. तरीसुद्धा माझ्यावरती त्यांनी खोटे आरोप केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणानंतर त्या प्रकरणी वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी करण्याचे काम करण्यात आले आहे. त्यावेळी चौकशी आयोगासमोर प्रकाश आंबेडकर यांच्याकडे प्रतिज्ञापत्र आले तरी त्यांनी माझ्या नावाचा उल्लेखसुद्धा केला नाही असंही त्यांनी यावेळी म्हटेल आहे.

तर कोणतेही पुरावे नसल्याने शरद पवार यांनीदेखील या प्रकरणात घुमजाव केला असून त्यांच्या प्रतिज्ञापत्रात देखील माझं नाव नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारे चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर एनआयएनेदेखील त्यामध्ये क्लीन चीट दिली आहे तरीही भीमा कोरेगाव प्रकरणात माझं नाव घेतलं जाते असंही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

या प्रकरणाची माहिती बाहेर येणे गरजेची आहे. तसेच यावेळी ते म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी बाहेर येऊ द्या मग आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू व या संदर्भात दावा दाखल करण्यासंदर्भात मी वकिलांकडे आग्रह करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Non Stop LIVE Update
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.