AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचा सकाळचा चहाचा कप आता महागणार; अमूलपाठोपाठ आणखी दोन कंपन्यांनी दूधाचे दर वाढवले, आता 1 लीटरसाठी…

देशात महागाईचा भडका उडाला असून अमूल पाठोपाठ मदर डेअरी आणि वेरका कंपनीने दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली आहे. १४ मे २०२६ पासून लागू झालेल्या या नवीन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे मासिक बजेट कोलमडणार आहे.

तुमचा सकाळचा चहाचा कप आता महागणार; अमूलपाठोपाठ आणखी दोन कंपन्यांनी दूधाचे दर वाढवले, आता 1 लीटरसाठी...
milk
| Updated on: May 14, 2026 | 10:09 AM
Share

देशभरातील सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा पुन्हा एकदा मोठा फटका बसला आहे. अमूलपाठोपाठ मदर डेअरी आणि वेरका यांसारख्या प्रमुख दुग्ध कंपन्यांनी दूधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे घरगुती बजेटवर महागाईचा नवा बोजा पडला आहे. हे सर्व नवीन दर आज १४ मे २०२६ पासून सर्वत्र लागू झाले आहेत. त्यामुळे खिशाला कात्री लागली आहे.

मदर डेअरी आणि अमूलने दिलेल्या माहितीनुसार, दूध उत्पादनाचा खर्च वाढल्याने हा निर्णय घ्यावा लागला आहे. गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करण्याच्या किंमतीत सुमारे ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जनावरांच्या चाऱ्याच्या आणि देखभालीच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण वाढला आहे. तसेच वाहतूक आणि प्रक्रिया खर्चात वाढ झाल्यामुळे कंपन्यांनी हा बोजा ग्राहकांच्या खांद्यावर टाकला आहे.

शहराचे नाव फुल क्रीम दूध टोन्ड दूध गाईचे दूध डबल टोन्ड
दिल्ली-एनसीआर ₹७२ ₹६० ₹६२ ₹५४
मुंबई ₹७२ ₹६० (अमूल ताझा)
कोलकाता ₹७२ ₹६०
चेन्नई ₹७२ ₹६२ ₹६२

वेरका दुधाचे दरही वाढले

पंजाब आणि हरियाणा भागात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या वेरका (Verka) दुधाच्या किमतीतही आता वाढ झाली असून चंदीगडसह ट्राय-सिटीमधील ग्राहकांना याचा थेट फटका बसणार आहे. नवीन दरवाढीनुसार, ५०० मिली फुल क्रीम दुधाचे पाकीट आता ३५ रुपयांऐवजी ३६ रुपयांना मिळणार आहे, तर ५०० मिली स्टँडर्ड दुधाचा दर ३२ रुपयांवरून वाढवून ३३ रुपये करण्यात आला आहे. याशिवाय, ५०० मिली गाईच्या दुधासाठी आता ग्राहकांना ३१ रुपये मोजावे लागतील. प्रामुख्याने उत्पादन खर्च आणि दूध संकलन दरातील वाढीमुळे कंपनीने प्रति लिटर २ रुपयांपर्यंत ही दरवाढ लागू केली आहे.

सर्वसामान्यांवर परिणाम

अमूल आणि मदर डेअरीने लागोपाठ ही दरवाढ केल्यामुळे दिल्ली, मुंबई, नोएडा आणि कोलकाता यांसारख्या शहरांतील मध्यमवर्गीय कुटुंबांचे मासिक बजेट बिघडणार आहे. सकाळच्या चहापासून ते मिठाईपर्यंत सर्वच गोष्टी आता महागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश