राज्यात भाजपला बसणार जबर धक्का, अनेक ठिकाणी राहावं लागणार महापौर पदापासून दूर? हा पक्ष करणार मोठा खेळ
महापालिका निवडणुकीच्या निकालात भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राज्यात भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या, मात्र त्यानंतर आता एक मोठी बातमी समोर येत आहे.

महापालिका निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपनं मोठं यश मिळवलं आहे. राज्यात भाजप नंबर एकचा पक्ष बनला आहे. महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांमध्ये भाजपच्या सर्वात जास्त जागा आल्या, तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना शिंदे गट आहे. दरम्यान राज्यात जरी भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असले, तरी मात्र अशा काही महापालिका आहेत, जिथे भाजपला आपला महापौर बसवण्यासाठी मित्र पक्षांच्या पाठिंब्याची गरज लागणारच आहे. या महापालिकेत भाजपला एक हाती सत्ता मिळवता आलेली नाहीये, त्यामुळे आता सर्वच महापालिकांमध्ये महापौर पादासाठी मोठी रस्सीखेच दिसत असून, संख्याबळाची जुळवाजुळवी करण्यास सुरुवात झाली आहे.
ज्यामध्ये मुंबईसह अनेक महापालिकांचा समावेश होतो. मुंबईमध्ये देखील भाजपला मोठं यश मिळालं, मुंबईमध्ये भाजपचे तब्बल 89 नगरसेवक निवडून आले, मात्र तरी देखील पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही, तर दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे 29 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे या महापालिकेत महापौर पदासाठी भाजपला शिवसेना शिंदे गटाची मदत घ्यावी लागणार आहे. मुंबई प्रमाणेच कोल्हापूरची पण स्थिती आहे. कोल्हापूरमध्ये भाजपने यावेळी जोरदार मुसंडी मारली, या महापालिकेत भाजपचे 27 नगरसेवक निवडून आले, तर शिवसेना शिंदे गटाचे 15 नगरसेवक आहेत. काँग्रेसचे सर्वाधिक 37 नगरसेवक आहेत. महापालिकेत सत्ता स्थापन करायची असल्यास इथे देखील भाजपला शिवसेना शिंदे गटाची मदत लागणार आहे, मात्र या महापालिकेत शिवसेना शिंदे गट काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू आहे.
भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला, मात्र दुसरीकडे एमआयएमने देखील या निवडणुकीत मोठं यश मिळवलं आहे, अनेक ठिकाणी एमआयएमचे नगरसेवक निवडून आल्यानं काही ठिकाणी एमआयएम हा आता किंगमेकरच्या भूमिकेत पहायला मिळू शकतो, तसे स्पष्ट संकेत एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी दिले आहेत. भाजपला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी काही महापालिकेत आम्ही सर्व पक्षांना एकत्र करू असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता काही महापालिकांमध्ये सर्वाधिक जागा येऊन देखील भाजपला सत्तेतून बाहेर बसावं लागू शकतं.
