पालकांसाठी चांगली बातमी, मुलांच्या शाळांची वेळ बदलली, आता या वेळेत भरणार शाळा

maharashtra school time change | राज्यात अनेक वर्षांपासून प्राथमिक शाळा सकाळी भरतात. यासंदर्भात राज्यपाल रमेश बैस यांनी सूचना केल्यानंतर हा विषय चर्चेला आला. आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत घोषणा केली.

पालकांसाठी चांगली बातमी, मुलांच्या शाळांची वेळ बदलली, आता या वेळेत भरणार शाळा
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 19, 2023 | 7:49 AM

अविनाश माने, नागपूर, दि.19 डिसेंबर | महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळच्या सत्रामध्ये तर माध्यमिक शाळांचे वर्ग दुपारच्या सत्रामध्ये भरले जात आहेत. परंतु आता ही परंपरा तोडली जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शाळांच्या वेळा बदलण्याची घोषणा विधिमंडळात केली. बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. यामुळे लहान मुलांच्या शाळांची वेळ बदलण्याची सूचना राज्यापाल रमेश बैस यांनी केली होती. येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी ९ वाजल्यानंतरच सुरू करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली.

समितीची स्थापना करणार

महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळी भरतात. तर माध्यमिक शाळांचे वर्ग दुपारी भरतात. माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे वय 12 वर्षांच्या पुढे तर प्राथमिक शाळांमधील मुलांचे वय 3 ते 10 वर्ष असते. त्यामुळे प्राथमिक शाळा दुपारी हव्यात आणि माध्यमिक शाळा सकाळी हव्यात, अशी सूचना शिक्षणतज्ज्ञांकडून येत होत्या. याबाबत राज्यपाल रमेश बैस यांनीच सूचना केली. यामुळे आता दुसरीपर्यंतची प्राथमिक शाळा नऊ वाजता होणार आहे. परंतु इतर वर्गांबाबत निर्णय घेण्यासाठी समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले. शाळांची वेळ बदलली असल्यामुळे आता शहरी पालकांना दिलासा मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

मनोवैज्ञानिक, बालरोग तज्ज्ञ असणार समितीत

बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांची शाळा उशिराने सुरू करण्याबाबत सरकारने विचार करावा, असे राज्यपालांनी अलिकडेच सुचविले होते. आता याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. दीपक केसरकर म्हणाले की, राज्यपालांच्या या मताशी सरकार सहमत आहे. मात्र एकट्याने याबाबत निर्णय घेणे योग्य नसल्याने तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. मनोवैज्ञानिक, बालरोग तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे केसरकर यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.