AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुलाबराव पाटील म्हणाले, ‘एकनाथ शिंदे सरकार काहीच करत नाही, संजय राऊत तुमचं….’

सरकार काहीच करत नाही तेरा क्या होगा रे संजय राऊत? शिंदे सरकार काहीच करत नाही. अंगणवाडी सेविका आशा वर्कर करता मानधन वाढवण्याची तरतूद केली. तरी म्हणतात या सरकारने काहीच केलं नाही संजय गांधी निराधाराचे हजारचे पंधराशे रुपये केले तरी म्हणतात एकनाथ शिंदे सरकारने काहीच केलं नाही.

गुलाबराव पाटील म्हणाले, 'एकनाथ शिंदे सरकार काहीच करत नाही, संजय राऊत तुमचं....'
MINISTER GULABRAO PATIL IN AZAD MAIDANImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Oct 25, 2023 | 12:11 AM
Share

मुंबई | 24 ऑक्टोंबर 2023 : जवळपास 37 वर्षापासून दसरा कसा गावामध्ये होतो आम्ही पाहिलेला नाही आंघोळ करायची मराठी माणसाकडे वडापाव खायचा आणि संध्याकाळी चार वाजता नवे कपडे घालून शिवतीर्थावर जागा सांभाळायची असे आम्ही कार्यकर्ते आणि आज बरेच लोक आम्हाला गद्दार म्हणतात. बाळासाहेब यांची आठवण काढल्याशिवाय शिवसैनिकांचा दिवस जात नाही. मुख्यमंत्री म्हणतात काहीच काम करत नाही. कोण बोलते ते आपल्याला माहित आहे. ते संजय राऊत नावाचं मशीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचे आहे ते टीका करतंय, असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला.

माननीय उद्धव ठाकरे साहेबांना माझी विनंती आहे की ज्या अजित पवार साहेबांनी आमच्यामध्ये येऊन लव मेरेज केलं त्यांच्याबाबतीत आपलं काय मत आहे? जागल्याशिवाय जाग येत नाही, ओढल्याशिवाय काडी पेटत नाही आणि बाळासाहेबांची आठवण घेतल्याशिवाय आमच्या सारखा शिवसैनिकांचा दिवस जात नाही असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणे काहीच काम करत नाही

एक रुपयामध्ये पीक विमा मिळाला त्यात मधला मी एक शेतकरी आहे मिळाला की नाही? तीन हजार तीनशे बारा कोटी रुपयाची तरतूद सरकारने केली. एक रुपयामध्ये शेतकर्यांचा विमा काढला. तरी ते संजय राऊत नावाचं मशीन म्हणत की सरकार काही करत नाही. नमो शेतकरी योजना केंद्राप्रमाणं राज्यानं काढली. सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा असे एक कोटी आणि पंधरा लाख कुटुंबांना शेतकऱ्यांच्या त्याचा लाभ मिळणार आहे. तरी म्हणतात की एकनाथ शिंदे साहेब शेतकऱ्यांकरता काहीच करत नाही.

महात्मा फुले ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना जवळपास एक्कावन्नशे आठ कोटी रुपयाची ही योजना राबवली गेली. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे गेले तरी म्हणतात की एकनाथराव शिंदे सरकार काहीच करत नाही. नुकसानग्रस्त कांद्यांच्या शेतकऱ्यांना तीनशे पन्नास रुपये प्रति quintal दिले गेले. तरी म्हणतात हे सरकार काहीच करत नाही. पाऊसयेई नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात आली. एनडीआरफ चे जे norms आहेत ते बदलून देण्यात आले. दोन एकरची जी मर्यादा होती. ती तीन एकरची केली. शंभर रुपयाचा शिधा केला संजय राऊत तेरा क्या होगा रे शंभर रुपयाचा शिधा केला. दसऱ्याला शेतकऱ्यांच्या घरात, गरीबाच्या घरात, मजुराच्या घरात दिला. आता दिवाळीला दिला जाणार आहे तरी म्हणतात की शिंदे सरकार काहीच करत नाही.

आपला दवाखाना जिथे गरीब राहतो जिथे शेतकरी राहतो. त्या शेतकऱ्याला दवाखाना, वंचित प्राथमिक इलाज व्हावा याच्याकरता जवळपास एक हजार दवाखाने सुरू केलेत. तरी म्हणतात की शिंदे सरकार काहीच करत नाही. मुख्यमंत्री निधीमधून मागच्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये फक्त अडीच कोटी रुपये दिले गेले. या सरकारने मुख्यमंत्री सहाय्यता मध्ये सव्वाशे कोटी रुपये दिले तरी म्हणतात, शिंदे सरकार काहीच करत नाही.

अंगणवाडी सेविका आशा worker करता मानधन वाढवण्याची तरतूद केली तरी म्हणतात या सरकारनं काहीच केलं नाही. संजय गांधी निराधाराचे हजारचे पंधराशे रुपये केले. तरी म्हणतात एकनाथ शिंदे सरकारने काहीच केलं नाही. पाणीपुरवठा योजनामध्ये जलजीवन missionच्या अंतर्गतमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमानाने पस्तीस हजार गावांमध्ये पाण्याच्या योजना सुरू केल्या तरी म्हणतात की शिंदे सरकारने काहीच केलं नाही.

हर घर जलसे नल, नलसे जल, ही योजना सुरू केली. माझ्या माय बहिणीले ST मध्ये पन्नास टक्के सूट दिली. म्हातारा माणसाला शंभर टक्के फुकट केलं. ज्या पंढरपूरमध्ये सात आठ लाख लोकं traveling करून दर्शन घ्यायचे. तिथे पंचवीस लाख लोकांनी दर्शन घेतलं. तरी म्हणतात की शिंदे सरकारने काहीच केलं नाही. बाप नही देखी गोधडी और सपने मै आ गई खाट मला तरी असं वाटतं की मी बर्याच योजना सरकारच्या सांगू शकतो पण या मंत्रिमंडळातला सदस्य म्हणून खेड्यातला एक मंत्री म्हणून ज्या निर्णय सरकारने घेतले ते निर्णय थोडक्यामध्ये मांडण्याचा मी याठिकाणी प्रयत्न केलाय असे ते म्हणाले.

‘दारू मै अकेला चांद झगमगत आहे गुलाब’, त्यामुळे यांनी आपल्यावर कितीही आरोप केले तरी तुमचं तोंड हे माहित झालं पाहिजे. सरकारनी काय कामं केली आहे हे जनतेपर्यंत सांगितले पाहिजे. सगळ्यात जास्त महाराष्ट्राचा दौरा करणारा मुख्यमंत्री या देशामध्ये कोणी असेल तर त्याचं नाव आहे एकनाथराव संभाजीराव शिंदे. घरामध्ये बसून काहीच होत नाही. मैदानामध्ये उतरावं लागतं. या पन्नास लोकांनी या देशामध्ये इतिहास लिहिलाय. जो भगवा झेंडा वंदनीय शिवसेना प्रमुखांनी या मुंबईमध्ये रोवला. ज्या बाळासाहेबांनी डरकाळी फोडली म्हणजे मुंबई बंद. ज्या बाळासाहेबांनी आवाज दिला म्हणजे महाराष्ट्र बंद त्या बाळासाहेबांचे आम्ही शिवसैनिक आहोत असे त्यांनी ठणकावून सांगितले

निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.