मला दिलेली जबाबदारी मी पूर्ण केली, मुख्य रणनीतीकार देवेंद्र फडणवीसच, नितेश राणे यांनी म्हटले..

नितेश राणे यांनी नुकताच विरोधकांवर जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले. बाळा माने यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्यावर त्यांनी भाष्य केले. देवेंद्र फडणवीस रणनीतीकार असल्याचे त्यांनी म्हटले.

मला दिलेली जबाबदारी मी पूर्ण केली, मुख्य रणनीतीकार देवेंद्र फडणवीसच, नितेश राणे यांनी म्हटले..
Nitesh Rane
| Edited By: | Updated on: Jun 05, 2026 | 1:42 PM

बाळा माने यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर बाळा माने यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाकडून मोठी कारवाई करण्यात आली. कोकणात आता विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली. यावर नुकताच मंत्री नितेश राणे यांनी भाष्य केले. नितेश राणे यांनी म्हटले की, नितेश राणे हा प्रतिनिधी आहे, मुख्य रणनीतीकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. यामध्येच माझे कुठलेच काही योगदान नाही. महायुतीचा प्रतिनिधी म्हणून.. देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिनिधी म्हणून मी या पूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी होतो. जे निर्णय वरिष्ठ पातळीवर झाले. म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, सुनिल तटकरे, रविंद्र चव्हाण या सगळ्यांमध्ये जे काही निर्णय झाला. या जागेसंदर्भात त्याची अंमलबजावणी मी तिथे पुढाकार घेतला. मला जबाबदारी दिली गेली. ती जबाबदारी मी बोलल्याप्रमाणे पूर्ण केली आहे. शेवटच्या क्षणाला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला धक्का दिला, यावर बोलताना नितेश राणे यांनी म्हटले की, हे सर्व श्रेय आमच्या रणनीतीकारांचे आहे.

शेवटी आखणी त्यांनी करून दिलेली आहे. कोणी कसं काय करावं. कोणी कुठे कसे जावं हे त्यांनी करून दिले. जे आमचे रणनीतीकार आहेत, त्यांना तुम्ही सर्व श्रेय दिले पाहिजे. शेवटी ते चित्रपटाचे डायरेक्टर आहेत. त्यांनी आम्हाला या सीटच्या संदर्भात काय झालं पाहिजे, महायुती म्हणून आम्ही सीट सुरक्षितपणे निघावी. रणनीती ठरली, त्याची नुसती अंमलबजावणी झाली.

शेवटी जेव्हा आदेश येतात किंवा पक्ष म्हणून मला जबाबदाऱ्या दिल्या जातात. आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत. कार्यकर्त्याला काय काय जबाबदारी दिली जावे, हे आमच्या पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत. महायुतीचे वरिष्ठ नेते आहेत, आता 17 जागांवर निवडणूक आहे, वरिष्ठ नेते काय 17 जागांवर पोहोचू शकत नाहीत. उदाहरणार्थ नाशिकमध्ये उदय सामंत, दादा भुसे बघत आहेत. काही भागामध्ये बावनकुळे आहेत.

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण सगळीकडे लक्ष ठेऊन आहेत. तुम्ही उभे केलेल्या उमेदवारांना देवेंद्र फडणवीसांवर विश्वास जास्त  यात चुक कोणाची नितेश राणेंचा सवाल. कोकण विधान परिषदेत केवळ उबाठाची 55 मतं. तुम्ही आज त्याला नावं ठेवता. बाळ मानेंना तुमच्यावर विश्वास राहिला नाही हे तुमचं अपयश आहे. संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना नितेश राणे यांनी म्हटले की, संजय राऊतांनी पुरावे द्यावे.

संजय राऊतांना काही मिळालं नाही म्हणून त्यांना दु:ख आहे का? काही महिन्याआधी भांडूपमध्ये गांज्याची शेती आढळसी असं ऐकले. संजय राऊतांनी तब्येतीची काळजी घ्यावी. विरोधी उमेदवाराला नेतृत्वावर विश्वास न राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाली. त्यांनी स्वत: उमेदवारी अर्ज मागे घेतला. फेविकॉलवाले आम्हाला संपर्क करतायत,
इतका महायुतीचा जोड आहे. ते पण आम्हाला अॅडसाठी संपर्क करत आहेत.

Follow Us