AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राधाकृष्ण विखे पाटील यांची पहिल्यांदाच कडक प्रतिक्रिया, थेट मराठा आंदोलकांनाच सुनावले; असं काय केलं विधान?

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सध्या मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. मात्र, आंदोलक हे महापालिकेच्या समोरील मुख्य रस्त्यावर ठिय्या मांडून बसले असून त्यांनी भर रस्त्यावर गाड्या लावल्या आहेत. यामुळे मुंबईमध्ये वाहतूकीचा मोठा प्रश्न उपस्थित झालाय.

राधाकृष्ण विखे पाटील यांची पहिल्यांदाच कडक प्रतिक्रिया, थेट मराठा आंदोलकांनाच सुनावले; असं काय केलं विधान?
Radhakrishna Vikhe Patil
| Updated on: Sep 01, 2025 | 10:55 AM
Share

राज्यातील मराठा आंदोलनाचा प्रश्न चिघळताना दिसतोय. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. मात्र, मुंबई पालिकेच्या समोरील मुख्य रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्येही मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जमजले आहेत. शिवाय मुंबईतील मुख्य रस्त्यांवर त्यांनी वाहने लावल्याने वाहतूकीचे तीनतेरा वाजले आहेत. रस्त्यावर कबड्डी, खो खो आंदोलकांकडून खेळली जात आहेत. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा निर्णय घेत वाहतूकीत मोठे बदल केले आहेत. आता नुकताच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठे विधान मराठा आरक्षणाबद्दल केले.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले की, न्यायालयीन प्रक्रियेमुळे वेळ लागत आहे. सरकारने घेतलेला निर्णय कोर्टात टिकला पाहिजे, यासाठी आमच्याकडून प्रयत्न केली जात आहेत. मराठा समाजाने यापूर्वी बरीच मोर्चे काढली आहेत. त्याची चर्चा ही देशभर झाली आणि कुठेही गालबोट लागले नाही. कारण असे झाले तर समाजाची बदनामी होते. आता जी काही मंडळी काही प्रकार करतात रस्ते अडवणे किंवा रिर्झेव बॅेंकेसमोर जाऊन घोषणाबाजी केल्याने आरक्षण मिळणार नाहीये, असे केल्याने प्रश्न सुटणार नाही.

आज जरांगे पाटील हे स्वत: आझाद मैदानावर बसलेले आहेत. तर सर्व मराठा बांधवांनी देखील आझाद मैदानावरच गेले पाहिजे आणि त्या आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे. आपण मुंबईला आलो कशा करता? त्यामुळे मुंबईकरांचे हाल नको आहेत. आपलीही बदनामी नको. आंदोलनकर्त्यांमुळे मुंबईमध्ये थोडा परिणाम होईल, पण मला वाटत नाही की, यावर टीका करण्याचे काही कारण आहे.

शेवटी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मराठा बांधव हा आझाद मैदानात येत असेल तर त्यात गैर काही नाही पण त्याशिवाय अन्य ठिकाणी जाऊन दैनंदिन जीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्यात समाजाचीही बदनामी होते, याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे. राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री, उपसमिती अध्यक्ष आणि महाधिवक्ता यांच्यात बैठक पार पडणार आहे. जरांगेंच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात कायदेशीर मुद्दे उपस्थित होत असल्याने सरकारची खलबतं.

तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.