AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ते आले, मारलं अन्…मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट…मीरा रोडच्या व्यापाऱ्यानेच सांगितलं रात्री काय घडलं?

मीरा भाईंदरमध्ये एका व्यापाऱ्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर आता तेथील व्यापारी आक्रमक झाले आहेत.

ते आले, मारलं अन्...मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट...मीरा रोडच्या व्यापाऱ्यानेच सांगितलं रात्री काय घडलं?
mns mira bhayandar
| Updated on: Jul 03, 2025 | 3:57 PM
Share

Meera Bhaindar MNS Viral Video : मीरा भाईंदरमध्ये काही दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्याला मराठीच्या मुद्द्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. आता मीरा भाईंदरमधील व्यापरी तसेच व्यापारी संघटनांनी मनसेविरोधात मोर्चा काढला आहे. तसेच मीरा भाईंदरच्या व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली आहे. दरम्यान, ज्या व्यापाऱ्याला मारहाण झाली होती, त्यानेच त्याच्यासोबत नेमकं काय घडलं, याची माहिती दिली आहे. मनसेचे कार्यकर्ते आले. त्यांनी येऊन मराठी बोलली पाहिजे असे सांगत मला मारहाण केली तसेच शिवीगाळ केली, असा आरोप या व्यापाऱ्याने केला आहे.

हिंदी नव्हे तर मराठीत बोल

त्या रात्री साधारण साडे दहा वाजता मनसे पक्षाचे सहा ते सात जण दुकानात आले. कॅश काऊंटरजवळ येऊन त्यांनी पाण्याची बॉटल मागितली. पाण्याची बॉटल दहा रुपयांची हवी आहे की 20 रुपयांची हवी आहे, असं कॅश काऊंटरजवळच्या कर्मचाऱ्याने विचारलं. त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते म्हणाले की हिंदी नव्हे तर मराठीत बोल. महाराष्ट्रात व्यवसाय करायाचा असेल तर मराठी बोलावं लागेल,असं हे कार्यकर्ते म्हणाले. तसेच त्यांनी दुकानातील कर्मचाऱ्यांना शिव्या दिल्या. दुकान फोडून टाकण्याचीही त्यांनी धमकी दिली, अशी माहिती त्या व्यापार्‍याने दिली.

मला मारलं, शिवीगाळ केली

मी त्यावेळी तिथेच उभा होतो. मी म्हणालो की काऊंटरवरच्या व्यक्तीला उत्तर प्रदेशमधून येऊन सात ते आठ महिनेच झाले आहेत. त्याला मराठी येत नाही. मी या दुकनाचा मालक आहे, असं त्यांना सांगितलं. त्यानंतर आता नुकतेच विधेयक मंजूर झाले आहे. मराठी बोललं पाहिजे. हिंदी भाषा बोलणाऱ्या व्यक्तीला कामावर का ठेवलं, असा जाब त्यांनी मला विचारला. माझे दुकान महाराष्ट्रात आहे, असे मी त्यांना म्हणालो. त्यानंतर महाराष्ट्रात कोणती भाषा बोलली जाते? असा प्रश्न त्यांनी केला. या प्रश्नाचे उत्तर देताना महाराष्ट्रात वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात, असं मी त्यांना बोललो, अशी माहिती त्या व्यापार्‍याने दिली. तसेच हे सर्व घडल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते माझ्यावर तुटून पडले. तीन ते चार जणांनी मला मारलं. इतर तिघांनी मला शिव्या दिल्या, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

हा मोर्चा भाजपा पुरस्कृत, मनसेचा दावा

दरम्यान, आता मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या मारहाणीनंतर मीरा भाईंदरमधील व्यापाऱ्यांनी मनसेविरोधात मोर्चा काढला आहे. व्यापाऱ्याला मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. तर हा मोर्चा भाजपा पुरस्कृत आहे, असा दावा मनसेने केला आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा