चांगल्या पोस्टसाठी चमचेगिरी, मुश्रीफांचं डीवायएसपींना प्रत्युत्तर

कोल्हापूर: कोल्हापूर महापालिकेतील महापौर निवडणूक काल चांगलीच गाजली. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी विरुद्ध भाजप-ताराराणी आघाडीमध्ये चुरस होतीच, शिवाय काल पोलीस आणि लोकप्रतिनिधींमध्ये बाचाबाची पाहायला मिळाली. पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव यांनी आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांना महापालिकेत जाण्यापासून रोखलं. इतकंच नाही तर आम्ही नोकरी करतोय, राजकारण नाही, असं सुनावलंही. डीवायएसपी सुरज गुरव यांचा हा …

चांगल्या पोस्टसाठी चमचेगिरी, मुश्रीफांचं डीवायएसपींना प्रत्युत्तर

कोल्हापूर: कोल्हापूर महापालिकेतील महापौर निवडणूक काल चांगलीच गाजली. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी विरुद्ध भाजप-ताराराणी आघाडीमध्ये चुरस होतीच, शिवाय काल पोलीस आणि लोकप्रतिनिधींमध्ये बाचाबाची पाहायला मिळाली. पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव यांनी आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांना महापालिकेत जाण्यापासून रोखलं. इतकंच नाही तर आम्ही नोकरी करतोय, राजकारण नाही, असं सुनावलंही. डीवायएसपी सुरज गुरव यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजला.

त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “चांगल्या पोस्टसाठी हे पोलीस अधिकारी चमचेगिरी करतात. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामुळे कोल्हापुरात चहा पेक्षा किटली गरम झाली असल्याची पाहायला मिळत आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी हुज्जत घातली, त्यांच्याविरोधात हक्कभंग आणणार” असं यावेळी हसन मुश्रीफ म्हणाले.

डीवायएसपी सुरज गुरव काय म्हणाले?

“सायेब, आम्ही नोकऱ्या करतोय, राजकारण करत नाही, वर्दीवर यायचं काम नाही, तुम्ही घरला जा”, अशा शब्दात कोल्हापूरचे डीवायएसपी सुरज गुरव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना काल सुनावलं.  महापालिकेत नगरसेवकांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. त्यावेळी माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील हे आत जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यासोबत पोलिसांची बाचाबाची झाली.

वाचा: हसन मुश्रीफांना भिडणारे DYSP सुरज गुरव कोण?

कोण आहेत डीवायएसपी सुरज गुरव?

सुरज गुरव हे मूळचे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे रहिवासी आहेत

सुरज गुरव 2013 मध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले.

नाशिक ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांनी ट्रेनिंग पूर्ण केलं.

त्यानंतर त्यांनी जळगावमध्ये प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक म्हणून कामाला सुरुवात केली

त्यानंतर सुरज गुरव कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात पोलीस उपअधीक्षक म्हणून  रुजू झाले.

शाहूवाडीनंतर ते सध्या करवीर पोलीस उपअधीक्षकपदाची जबाबदारी सांभाळत आहेत

सध्या कोल्हापूर शहर प्रभारी उपअधीक्षक म्हणून त्यांच्याकडे कार्यभार आहे.

कोल्हापूर महापौर

कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजप-ताराराणी आघाडीला धूळ चारत, महापौरपद टिकवलं आहे. कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता मोरे यांची निवड झाली आहे. त्यांनी  भाजपा – ताराराणी आघाडीच्या जयश्री जाधव यांचा पराभव केला.

संबंधित बातम्या

नोकऱ्या करतोय, राजकारण नाही, वर्दीवर यायचं नाही, DYSP ने मुश्रीफांना सुनावलं  

बंटी-मुश्रीफांनी करुन दाखवलं, कोल्हापुरात आघाडीचाच महापौर   

नोकऱ्या करतोय, राजकारण नाही, वर्दीवर यायचं नाही, DYSP ने मुश्रीफांना सुनावलं   

हसन मुश्रीफांना भिडणारे DYSP सुरज गुरव कोण?   

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *