AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

karmala Sugar Factory Election : आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुक : शरद पवार गटाची एकहाती सत्ता

आदिनाथ सहकारी साखर काखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 8 वाजता सुरुवात झाली ...दुपारपर्यंत आमदार नारायण पाटील यांचे पॅनेल दीड ते दोन हजार मतांनी पुढे होते. मतमोजणीचा हाच ट्रेंड कायम राहिल्याने नारायण पाटील यांच्या पॅनलचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले आहेत.

karmala Sugar Factory Election : आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुक : शरद पवार गटाची एकहाती सत्ता
Adinath Sugar Factory Election
| Updated on: Apr 19, 2025 | 8:50 PM
Share

सोलापूरातील करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील २५८३ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांच्या पोमलवाडी गटाचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले असून शरद पवार गटाची एक हाती सत्ता या कारखान्यावर आली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर नव्याने कामाला लागलेल्या माजी आमदार संजय शिंदे यांना पुन्हा एकदा पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.

करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार नारायण आबा पाटील २५८३ मतांनी विजयी झाले आहेत. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे 21 पैकी 21 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती राखीव प्रतिनीधी मतदार संघातुन आमदार नारायण पाटील गटाचे राजाभाऊ कदम 1580 मतांनी विजयी झाले आहेत.

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत आमदार नारायण पाटील गटाचे डॉ. हरिदास केवारे, श्रीमान चौधरी, महादेव पोरे, दत्तात्रय गव्हाणे, रविकिरण फुके, दशरथ हजारे,आबासाहेब अंबारे, किरण कवडे, नवनाथ झोळ, संतोष पाटील हे 1 विजयी झाले आहेत.

संजयमामा शिंदे यांचा पराभव

माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर माजी आमदार संजयमामा शिंदे (सोलापूर) यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला आहे. त्यांचा एकूण 1565 मतांनी पराभव झाला आहे.

पोमलवाडी गटाचे विजयी उमेदवार

आमदार नारायण पाटील गटाचे पोमलवाडी गटाचे उमेदवार

किरण कवडे – 8571

नवनाथ झोळ – 8343

संतोष पाटील – 8328

माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचे उमेदवार

दशरथ पाटील – 6701

बबन जाधव – 6837

नितीन राजे भोसले – 6708

रामदास झोळ गटाचे उमेदवार

प्रा रामदास झोळ – 1137

भरत जगताप – 766

प्रकाश गिरंजे – 765

 पहिल्या फेरीतच पाटील गटाची आघाडी

करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने मतमोजणीच्या पहिल्या फेरीतच सुमारे दीड ते दोन हजार मतांनी आघाडी घेतली होती. आदिनाथ कारखान्याच्या झालेल्या निवडणूकीत आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजय शिंदे, दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांचे तीन पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. निवडणुकीच्या रिंगणात तीन पॅनेल असले तरी खरी लढत ही आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार संजय शिंदे यांच्या पॅनेलमध्येच झाली आहे.

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान