AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार अपघात प्रकरणाचा अहवाल येण्यापूर्वी मोठ्या घडामोडी, रोहित पवार थेट मुख्यमंत्र्‍यांच्या भेटीला…

राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर मोठी खळबळ उडाली. त्यामध्येच रोहित पवार यांच्याकडे काही धक्कादायक आरोप केली जात आहेत. आता रोहित पवार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीस पोहोचले आहेत.

अजित पवार अपघात प्रकरणाचा अहवाल येण्यापूर्वी मोठ्या घडामोडी, रोहित पवार थेट मुख्यमंत्र्‍यांच्या भेटीला...
Devendra Fadnavis and Rohit Pawar
| Updated on: Feb 27, 2026 | 1:22 PM
Share

28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून बारामतीकडे अजित पवार निघाले असता त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या विमान अपघातामुळे मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांचे विमान जमिनीवर कोसळल्यानंतर काही स्फोट झाला. हेच नाही तर अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर काही धक्कादायक असे सीसीटीव्ही फुटेजही पुढे आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अजित पवार यांचे विमान स्पष्टपणे एका बाजूला झुकताना दिसले. अजित पवार यांच्या निधनाचे कळताच पवार कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती बारामतीमध्ये पोहोचली. पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. यावेळी पूर्ण पवार कुटुंब एकत्र दिसले. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार मुलगा जय पवार याच्यासोबत मुंबईत पोहोचल्या. यावेळी त्यांनी आपल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या बैठकीबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले.

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर रोहित पवार गंभीर आरोप करताना दिसत आहेत. रोहित पवार यांच्याकडून अजित पवार ज्या VSR कंपनीच्या विमानातून प्रवास करत होते, त्या कंपनीवर काही आरोप करण्यात आली. सध्या त्यांच्या विमान उड्डाणावर बंदी घातली, VSR कंपनीला वाचवण्याकरिता प्रयत्न केली जात असल्याचाही आरोप रोहित पवार यांनी केला.

थोड्यावेळापूर्वीच रोहित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. आता रोहित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी चर्चा करण्यासाठी रोहित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार. विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या दालनात ही बैठक होईल.

काही वेळापूर्वीच रोहित पवार यांनी म्हटले होते की, सत्ताधाऱ्यांनी किमान या प्रकरणात एफआयआर नोंदवण्याकरिता मदत करावी. त्यानंतर रोहित पवार थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले आहेत. आज रात्री 7 वाजता अहवाल येणार आहे. थातूरमातूर अहवाल देऊ नये, असेही रोहित पवार यांनी म्हटले. रोहित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत नक्की काय घडते, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...