AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! विधान परिषदेची निवडणूक घ्यायची गरज आहे का? बड्या नेत्याने का केली मागणी?

MLC Election : राज्यात इंधन तुटवडा निर्माण झाला आहे, त्यामुळे राज्यातील विधान परिषदेची निवडणूक घेणे गरजेचे आहे का? असा सवाल एका बड्या नेत्याने केला आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

मोठी बातमी! विधान परिषदेची निवडणूक घ्यायची गरज आहे का? बड्या नेत्याने का केली मागणी?
Rohit Pawar on MLC ElectionImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 25, 2026 | 4:21 PM
Share

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. आजपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशातच आता ही निवडणूक घेण्याची गरज आहे का? असा सवाल राज्यातील एका बड्या नेत्याने उपस्थित केला आहे. देशात सध्या इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे, महागाई वाढली आहे, त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकरण्याबाबत विचार करावा असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

विधानपरिषद निवडणूक घेण्याची गरज आहे का, रोहित पवारांचा सवाल

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले की, ‘आज राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात इंधन तुटवडा निर्माण झाला असून दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे, पुण्यात तर जमावबंदीचे देखील आदेश लागू झाले आहेत. अशा स्थितीत विधानपरिषद निवडणूक घेण्याची गरज आहे का ? यावर विचार होणं गरजेचं आहे.’

निवडणुकीत घोडेबाजार होणार

पुढे रोहित पवार यांनी म्हटले की, ‘असंही घोडेबाजार करूनच ह्या निवडणुका होणार आहेत. रिसॉर्ट, पर्यटन, मतदारांचा घोडेबाजार यावर शेकडो कोटी खर्च होतील. त्यामुळे निवडणूक आयोगाने राज्यातील बिकट परिस्थिती लक्षात घेत या निवडणुका पुढे ढकलायला हव्यात. निवडणुका पुढे गेल्यास या बिकट स्थितीत सरकारला सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल.’

विधानपरिषद निवडणुकीत घोडेबाजार – वडेट्टीवार

याआधी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानपरिषद निवडणुकीत घोडेबाजार होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, ‘निवडणुका हा उत्सव झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे अनेक नगरसेवक आमच्याही संपर्कात आहेत. त्यांच्याही अतंर्गत प्रचंड वाद आहेत. कोणीही डिसीजन घेतला तर दुसरा गट तयार आहेच आम्हाला मदत करायला. पण आम्ही त्या भानगडीत पडत नाही. जो घोडेबाजार चाललाा आहे, फोडाफोडीचा जो उत्सव चालला आहे. माझ्या माहितीप्रमाणे 5-5 लाख देऊन काही नगरसेवकांना उचलण्याचं काम सुरू आहे.’

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ