Sangram Jagtap: दिवाळीत फक्त हिंदूंकडूनच खरेदी करा; संग्राम जगताप यांचे वादग्रस्त विधान
Sangram Jagtap: सोलापूरमध्ये झालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चात आमदार संग्राम जगताप यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी दिवाळीत फक्त हिंदूंकडूनच खरेदी करा असे आवाहन केले आहे.

सध्या सगळीकडे दिवाळीची जोरदार तयारी सुरु आहे. दिवाळी म्हटले की नवे कपडे खरेदी करणे, घरात नव्या वस्तू घेणे, रोशनाई करणे, फराण बनवणे अशा अनेक गोष्टी आल्या. अनेकजण दिवाळीसाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना दिसतात. दरम्यान, आमदार संग्राम जगताप यांनी दिवाळी खरेदीवरुन केलेल्या आवाहानामुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी ‘दिवाळीत फक्त हिंदूंकडूनच खरेदी करा’ असे वादग्रस्त विधान केले आहे.
नेमकं काय म्हणाले?
सोलापूरमध्ये झालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चात आमदार संग्राम जगताप यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी, ‘दिवाळी निमित्ताने बाजारपेठ आहे. सर्वांना विनंती करतो, दिवाळीची खरेदी करताना आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्यातील नफा रिटर्न फक्त आणि फक्त हिंदू माणसांनाच झाला पाहिजे. अशा प्रकारची दिवाळी हिंदूंनी साजरी करावी’ असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
एमआयएमचे (MIM) प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी जगताप यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल विचारले असता, त्यांनी त्यावर बोलण्यास थेट नकार दिला. आगामी सणासुदीच्या काळात संग्राम जगताप यांच्या अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
काय म्हणाले होते इम्तियाज जलील?
अहिल्यानगर येथील सभेत माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आक्रमक भाषण केले. ‘आता नवीन फॅशन आली राज्य करायचे असेल तर मुस्लिम विरोधात बोला. एक छोटा चिंटू पाहिले बोलत होता आता तुमच्या शहरात एक चिकणी चमेली आली आहे. माझं पोलिस रेकॉर्डिंग करत आहे मात्र मी कोणाच नाव घेतले नाही. आपली सभा चिकणी चमेली पण बघत आहे. तुम्ही रोज बाप तो बाप हे गाण एकता. आम्ही तुमच्या बापाला सोडले नाही आम्ही मोदींच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो. तेव्हा तू काय चीज? मी मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांना विनंती करतो की संभाजीनगर रोडवरून तुमची गाडी घेऊन प्रवास करा. या रोडवरच डांबर कोण खात आहे?’ असे ते म्हणत आहेत.
