AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाच्या जीवाला धोका? त्या पत्रानं खळबळ

बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना अज्ञात व्यक्तीनं एक पत्र पाठवलं आहे. या पत्रामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. गायकवाड यांच्या मुलांच्या जीवाला धोका असल्याचा दावा या पत्रात करण्यात आला आहे.

आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाच्या जीवाला धोका? त्या पत्रानं खळबळ
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 05, 2025 | 8:27 PM

मोठी बातमी समोर येत आहे, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना अज्ञात व्यक्तीनं एक पत्र पाठवलं आहे. या पत्रामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. संजय गायकवाड यांच्या मुलाच्या जीवाला धोका असल्याचा दावा या पत्रामध्ये करण्यात आला आहे. दरम्यान यापुर्वीही 2 अशीच पत्र आल्याने आमदार संजय गायकवाड यांनी आता या प्रकरणात कारवाईची मागणी केली आहे. मात्र हे पत्र नेमकं कोणी पाठवलं? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये.

पत्रात नेमकं काय म्हटलं? 

“तुम्हाला पत्र लिहिण्याचे कारण की, तुम्हाला एक गोपनीय माहिती द्यायची आहे. तुमचे जुने सहकारी समाधान मोरे व त्यांचा भाचा रितेश खिल्लारे यांच्यामुळे तुमच्या धाकट्या मुलाला मृत्यूंजय गायकवाडच्या जीवाला धोका आहे.

त्याला मारण्याची त्यांनी सुपारी बांधून घेतली असून ते त्या कार्यासाठी सक्रीय झाले आहेत. त्यांची अशी मिटिंग झाली आहे. तरी आपण व आपले कुंटुंब यांचे रक्षण करावे. मी त्याच्या जवळची व्यक्ती असून मी प्रकट स्वरूपात येऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी लवकरात लवकर पाऊल उचलावे. वेळ निघून गेल्यावर काहीही उरणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहे. तुमचे आणि माझे ही. शिवरायांच्या चरणाची शपथ हा मजकूर खोटा नाही. आपण सतर्क राहावे.

टीप – वरील मजकूर हा खोटा नसून हा सत्य आहे. यामध्ये माझा कोणताच वैयक्तिक फायदा नसून, केवळ तुमच्या कुटुंबाप्रती काळजी आहे, म्हणून पत्राद्वारे तुम्हाला कळवत आहे. मृत्यूंजय दादांची काळजी घ्या, आई भवानी त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना, आपला शुभचिंतक” असा मजकूर या पत्रामध्ये आहे.

दरम्यान यापूर्वी देखील 2 अशीच पत्र आल्याने आमदार संजय गायकवाड यांनी आता या प्रकरणात कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील बोलणार आहेत. मात्र हे पत्र कोणी पाठवलं,  हे अद्याप समोर येऊ शकलेलं नाहीये.

भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी
भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी.
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला.
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक...
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक....
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान.
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ.
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं.
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा.
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका.
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे.
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद.