AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय रोकड, काय गाडी… 5 कोटींच्या घबाडाचा आरोप होताच शहाजी बापू पाटील काय म्हणाले?

आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत ही गाडी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची असल्याचा आरोप केला आहे. आता या आरोपावर शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय रोकड, काय गाडी… 5 कोटींच्या घबाडाचा आरोप होताच शहाजी बापू पाटील काय म्हणाले?
| Updated on: Oct 22, 2024 | 9:05 AM
Share

Shahaji Bapu Patil Reaction On Pune 5 Crore Cash Seized : राज्यात निवडणुकीपूर्वी आचारसंहिता लागली असताना पुणे पोलिसांना एक मोठं घबाड सापडलं आहे. काल पुण्यात खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून जवळपास 5 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली. ही गाडी सत्ताधारी आमदाराची असल्याचा दावा केला जात आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत ही गाडी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची असल्याचा आरोप केला आहे. आता या आरोपावर शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यात खेड-शिवापूर परिसरातून जप्त करण्यात ५ कोटींच्या रक्कमेवरुन सध्या राजकारणात खळबळ उडाली आहे. याप्रकरणावरुन शिवसेना खासदार संजय राऊतांनी चांगलाच निशाणा साधला आहे. ज्या गाडीत ही रक्कम सापडली ती गाडी मिंधे टोळीतील एका आमदाराची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काय बापू.. किती हे खोके? असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आता यावरुन शहाजीबापू पाटील यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण दिले.

शहाजीबापू पाटील काय म्हणाले?

“मी रोकड जप्त झाल्याची बातमी टीव्हीला पाहिली. माझं यात कुठेही नाव आलेलं नाही. या गाडीशी माझा कोणताही संबंध नाही. त्या तालुक्यात माझे हजारो कार्यकर्ते आहेत. पण ती गाडी कोणाची याबद्दल मला काहीही कल्पना नाही. मी काल दिवसभर खेड्या-पाड्यात फिरत लोकांशी संपर्क साधत होतो. रात्री १० वाजता मला ही बातमी टीव्हीवर दिसली”, असे शहाजीबापू पाटील म्हणाले.

“अमोल नलावडे हा शेकापचा कार्यकर्ता”

“अमोल नलावडे हा शेकापचा कार्यकर्ता आहे. त्याचे वडील शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी होते. गेल्या दोन वर्षांपासून तो माझ्यासोबत शिवसेनेचे काम करत आहे. त्यांचे अनेक व्यवसाय आहेत. त्यात नेमकं काय हे मला माहिती नाही”, असेही शहाजीबापू पाटील यांनी म्हटले.

“माझा कोणताही संबंध नाही”

“संजय राऊतांची सत्ता गेल्यापासून त्यांना झोपताना झाडं आणि उठताना डोंगर दिसत आहेत. याप्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. सांगोला म्हटल्यानंतर त्यांचा डोळ्यासमोर फक्त माझा चेहरा दिसतो. मला याबद्दल कोणतीही माहिती नाही. मी थोड्या वेळाने नेमकं प्रकरण काय याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे”, असे त्यांनी म्हटले.

संजय राऊत काय म्हणाले?

या प्रकरणानंतर संजय राऊतांनी ट्वीट करत शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर आरोप केला होता. “मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर १५ कोटी सापडले! हे आमदार कोण? काय झाडी… काय डोंगर…. मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास ७५ कोटी पाठवले. १५ कोटी चा हा पहिला हप्ता! काय बापू.. किती हे खोके?” असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा