AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MLA on Bus Steering: रस्त्यात बंद पडलेल्या एसटीला आमदाराचा ‘दे धक्का’, स्टेअरिंगही घेतले हातात, प्रवासीही आनंदले

धक्का देऊनही बस सुरू होत नसल्याने थेट आमदार निलेश लंके यांनी स्वतः बसचे स्टेअरिंग हातात घेतले. त्यांनी बसचे स्टेअरिंग हातात घेताच बस सुरू झाली. त्यामुळे प्रवाशांनी देखील आनंद व्यक्त केला. स्वतः आमदार बस चालवत असल्याचे बघून रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांनाही सुखद धक्का बसला.

MLA on Bus Steering: रस्त्यात बंद पडलेल्या एसटीला आमदाराचा 'दे धक्का', स्टेअरिंगही घेतले हातात, प्रवासीही आनंदले
आमदार एसटीच्या स्टिअरिंगवर Image Credit source: TV 9 marathi
| Edited By: | Updated on: Sep 03, 2022 | 5:36 PM
Share

अहमदनगर – रस्त्यावर बस बंद पडलेली असताना, त्याच मार्गावरुन जाणारे आमदार त्यांची गाडी थांबवतात. काय झालं आहे याची विचारपूस करतात. गाडीतून उतरुन थेट निघून न जाता, गाडीतून उतरुन एसटी बस दुरुस्तीसाठी विचारणा करतात. इतकंच नाही तर एसटी बसला धक्का देण्यासाठीही पुढे येतात. हे सगळं आपल्या इथे घडले असा आपल्याला वश्वास बसणार नाही, पण हे वास्तवात घडलं आहे. अहमदनगर- दौंड (Nagar Daund road)रस्त्यावर कोळगाव दरम्यान श्रीगोंदा-नगर एसटी बस (ST bus)बंद पडली होती.बराच वेळ धक्का मारून देखील बस सुरू होत नव्हती. त्याचवेळी त्या मार्गावरून जाताना आमदार निलेश लंके (Nilesh Lanke)यांनी आपली गाडी थांबवली आणि काय झाले आहे, याची विचारपूस केली. इतकचं नाही तर त्यांनी गाडीतून उतरुन बस लोटण्यासही मददत केली, बस लोटून देखील ती सुरू होत नव्हती. त्यावेळी निलेश लंकेंनी आणखी एक प्रयोग केला.

बस सुरु होईना म्हणून थेट स्टिअरिंगवर आमदार

धक्का देऊनही बस सुरू होत नसल्याने थेट आमदार निलेश लंके यांनी स्वतः बसचे स्टेअरिंग हातात घेतले. त्यांनी बसचे स्टेअरिंग हातात घेताच बस सुरू झाली. त्यामुळे प्रवाशांनी देखील आनंद व्यक्त केला. स्वतः आमदार बस चालवत असल्याचे बघून रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांनाही सुखद धक्का बसला. लोकप्रतिनिधईंनी जनतेच्या कामांसाठी कसे धावून जायला हवे, याचे उदाहरणच लंके यांनी घालून दिल्याची चर्चा प्रवाशांत होती.

निलेश लंके यांची समाजपयोगी कामांसाठी ओळख

पारनेर मतदारसंघाचे आमदार असलेले निलेश लंके हे त्यांच्या अशा समाजपोयगी कामामुळे नेहमीच चर्चेत राहिलेले आहेत. २०१६ सली त्यांनी राज्यशास्त्रात बीएची पदवी संपादन केली. त्यांची नेतृत्वक्षमता पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमदारकाची उमेदवारी दिली. निवडणूक जिंकून आल्यानंतर पारनेरसारख्या दुष्काळी तालुक्यासाठी निलेश लंके यांनी अनेक चांगली कामे केली आहेत. कोविडच्या काळात त्यांनी स्वताच्या हिमतीवर १ हजार बेडचे कोविड रुग्णालया उभारले होते, त्यामुळेही ते चर्चेत आले होते.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.