AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑल पिक्चर क्लिअर… कोण लढतंय कुणाविरोधात? यादी आली समोर; महायुती विरुद्ध महाविकास आघाडी थेट सामना

MLC Election MVA vs Mahayuti : विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर कोणत्या जागेवर कोण लढणार हे समोर आले आहे.

ऑल पिक्चर क्लिअर... कोण लढतंय कुणाविरोधात? यादी आली समोर; महायुती विरुद्ध महाविकास आघाडी थेट सामना
mahayuti vs mahavikas aghadiImage Credit source: Google
| Updated on: Jun 01, 2026 | 6:57 PM
Share

संपूर्ण राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातली 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या निवडणुकीत महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. दोन्ही आघाड्यांकडून ही निवडणूक जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या कोणता उमेदवार कुणाच्या विरोधात रिंगणात आहे, याची यादी समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

17 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत दोन्ही आघाड्यांकडून उमेदवारीसाठी मोठी चुरस पहायला मिळाली होती. अनेकांनी उमेदवारीसाठी आपली दावेदारी दाखल केली होती. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर अनेक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच काहींनी बंडखोरीचागी निर्णय घेतला आहे. अर्ज माघारी घेण्याची तारीख 4 जून आहे, तोपर्यंत बंडखोरांची समजूत काढण्याचे आव्हान राजकीय पक्षांसमोर असणार आहे.

महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत

  • सोलापूर : आदित्य फत्तेपूरकर (मविआ – काँग्रेस) विरुद्ध राजेंद्र राऊत (महायुती- भाजप)
  • अहिल्यानगर : करण ससाणे (मविआ – काँग्रेस) विरुद्ध प्राजक्त तनपुरे (महायुती- भाजप)
  • ठाणे : अभिजीत पवार (मविआ-राष्ट्रवादी शरद पवार) विरुद्ध रविंद्र फाटक (महायुती- शिवसेना)
  • जळगाव : शरद तायडे (मविआ -शिवसेना ठाकरे) विरुद्ध नंदकिशोर महाजन (महायुती- भाजप)
  • सांगली-सातारा : बाळासाहेब पाटील/अभयसिंह जगताप (मविआ-राष्ट्रवादी शरद पवार) विरुद्ध धैर्यशील माने (महायुती- भाजप)
  • नांदेड : रामदास पाटील (मविआ – काँग्रेस) विरुद्ध अमर राजूरकर (महायुती- भाजप)
  • यवतमाळ : साहेबराव कांबळे (मविआ – काँग्रेस) विरुद्ध दुष्यंत चतुर्वेदी (महायुती- शिवसेना)
  • पुणे : श्रीकांत पाटील (मविआ-राष्ट्रवादी शरद पवार) विरुद्ध विक्रम काकडे (महायुती- राष्ट्रवादी)
  • भंडारा-गोंदिया : दिलीप बनसोडे (मविआ – काँग्रेस) विरुद्ध अविनाश ब्राह्मणकर (महायुती- भाजप)
  • रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग – सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने (मविआ -शिवसेना ठाकरे) विरुद्ध अनिकेत तटकरे (महायुती- राष्ट्रवादी)
  • नाशिक : अनिल कदम (मविआ -शिवसेना ठाकरे) विरुद्ध विरुद्ध नरेंद्र दराडे (महायुती- शिवसेना)
  • वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : शैलेश अग्रवाल (मविआ – काँग्रेस) विरुद्ध अरुण लखानी (महायुती- भाजप)
  • अमरावती : हर्षदीप देशमुख (मविआ – काँग्रेस) विरुद्ध प्रवीण पोटे (महायुती- भाजप)
  • धाराशिव-लातूर-बीड : महेश देशमुख (मविआ – काँग्रेस) विरुद्ध बसवराज पाटील (महायुती- भाजप)
  • परभणी-हिंगोली : डॉ. विवेक नावंदर (मविआ -शिवसेना ठाकरे) विरुद्ध सईद खान (महायुती- शिवसेना)
  • छत्रपती संभाजीनगर-जालना – देवयानी कृष्ण पाटील डोणगावकर (मविआ -शिवसेना ठाकरे) विरुद्ध सुहास शिरसाट (महायुती- भाजप)
  • नागपूर (पोटनिवडणूक) : अतुल लोंढे (मविआ – काँग्रेस) विरुद्ध डॉ. राजीव पोतदार (महायुती- भाजप)

कोणता पक्ष किती जागा लढवणार?

महायुतीत भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वाधिक 8, ठाकरेंची शिवसेना 6, आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 3 जागा लढवणार आहे.

Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार