AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याणमध्ये मनसेला मोठा झटका, 320 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा, महापालिका निवडणुकीआधी राजकारण तापलं

कल्याणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 320 पदाधिकाऱ्यांनी सरसकट आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत (MNS 320 leaders resignation in Kalyan)

कल्याणमध्ये मनसेला मोठा झटका, 320 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा, महापालिका निवडणुकीआधी राजकारण तापलं
मनसे
| Updated on: Jan 24, 2021 | 11:04 PM
Share

कल्याण (ठाणे) : आगामी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्भूमीवर शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कल्याणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 320 पदाधिकाऱ्यांनी सरसकट आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. यामध्ये कल्याण पूर्व विभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, उपशाखा अध्यक्ष, गट अध्यक्ष यांचा समावेश आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी मनसेचे उपशहर अध्यक्ष संजय राठोड यांच्याकडे आपले राजीनामा सुपूर्द केले आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना ओळखून संजय राठोड यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली आहे (MNS 320 leaders resignation in Kalyan).

320 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे का?

माजी नगरसेवक अनंता चंदर गायकवाड यांनी मनसेत पुन्हा प्रवेश केला आहे. त्यांना पक्षाकडून कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्षपद देण्यात आलं आहे. पक्षात गेल्या कित्येक वर्षांपासून काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून गायकवाड यांना कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्षपद देण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी काही माजी नगरसेवक मनसेच्या वाटेवर असून त्यांना पुन्हा पक्षातर्फे मोठी जबाबदारी देऊन निष्ठावंताना डावलण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे (MNS 320 leaders resignation in Kalyan).

महापालिका निवडणुकीत पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचा फटका बसणार?

कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसे नगरसेवकांची संख्या जरी गेल्या पाच वर्षात कमी असली तरी मनसेला आगामी निवडणुकीत चांगली संधी आहे. तरुणांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चांगली क्रेझ आहे. त्यामुळे या क्रेझचा आगामी निवडणुकीत मनसेला फायदा होऊ शकतो. कारण विधानसभा निवडणुकीत कल्याण-डोबिंवली ग्रामीण मतदारसंघात मनसेचे उमेदवार राजू पाटील जिंकून आले होते. ते आजच्या घडीतील महाराष्ट्रातील मनसेचे एकमेव आमदार आहेत. त्यामुळे या आगामी महापालिका निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना चांगाला प्रतिसाद मिळू शकतो. पण अंतर्गत मतभेदाचा मोठा फटका मनसेला बसू शकतो. 320 पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांच्या नाराजीचा फटका मनसेला आगामी महापालिका निवडणुकीत बसू शकतो. त्यामुळे पक्षश्रेष्ठी नेमका काय निर्णय घेतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

कल्याण-डोंबिवलीतील सध्याचे पक्षीय बलाबल काय?

आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. आता आघाडी कशाप्रकारे तयार होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडी विरोधात भाजप आणि मनसे एकत्र लढणार का? हे जाणून घेण्यास नागरिकांना उत्सुकता आहे. आघाडीचा दगाफटका पाचही पक्षांना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

केडीएमसीत सध्या 122 प्रभाग आहेत. 11 नोव्हेंबर 2020 रोजी महापालिकेच्या सदस्य मंडळाचा कार्यकाळ संपला आहे. 12 नोव्हेंबरपासून प्रशासकीय राजवट सुरु आहे. प्रभाग रचना सोडत होणार होती. मात्र त्याआधी 18 गावांविषयी उच्च न्यायालयाचा निकाल आला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

केडीएमसीच्या 122 प्रभागांमध्ये सध्या कल्याण ग्रामीण भागातील 27 गावांचा समावेश आहे. मात्र, आता न्यायालयाच्या निर्णयावर केडीएमसीची प्रभाग रचना ठरणार आहे. दरम्यान, केडीएमसीत गेल्या पाच वर्षात 122 जागांपैकी 52 जागा शिवसेना, 42 जागा भाजप, 4 जागा काँग्रेस, 2 जागा राष्ट्रवादी, 1 जागा एमआयएम, 9 जागा मनसेकडे तर 10 अपक्ष होते.

गेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती नव्हती निवडणुकीनंतर युती झाली. मात्र, आता ही युती नाही. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होण्याची दाट शक्यता आहे. इतकेच नाही तर भाजप आणि मनसेची युती होऊ शकते.

शिवसेनेसोबत राष्ट्रवादी, काँग्रेस निवडणूक लढविणार असल्याने सेनेला हिंदूत्ववादी मतांचा फटका बसू शकतो. भाजप आणि मनसेची युती झाली तर भाजपला उत्तर भारतीय मतांचा फटका बसू शकतो. कारण मनसेला उत्तर भारतीयांची मते मिळणार नाहीत. येणाऱ्या काळात किती प्रभाग होतात. त्यानुसार निवडणूक होईल. मात्र कल्याण डोंबिवली शिवसेनाचा बालेकिल्ला राहिला आहे. यात भाजप आणि मनसे सत्ताबदल करू शकणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

हेही वाचा : The Kapil Sharma Show | चाहत्यांसाठी मोठा धक्का, कपिल शर्माचा शो बंद होणार?

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.