महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा, अनिल देशमुखांची तात्काळ उच्चस्तरिय चौकशी करा : राज ठाकरे कडाडले

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आपली भूमिका स्पष्ट केलीय.

महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा, अनिल देशमुखांची तात्काळ उच्चस्तरिय चौकशी करा : राज ठाकरे कडाडले


मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि होमगार्डचे महासंचालक परमबीर सिंग यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आपली भूमिका स्पष्ट केलीय. यात त्यांनी या प्रकरणाने महाराष्ट्राची प्रतिमेला काळिमा लागल्याचं सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय (MNS Chief Raj Thackeray comment on Ex Mumbai CP Parambir Singh letter to CM Thackeray and corruption).

राज ठाकरे म्हणाले, “मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी.”

परमबीर सिंगांचे आरोप काय?

परमबीर सिंग यांची बदली करण्यात आल्यानंतर अस्वस्थ असलेल्या सिंह यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांची तक्रार केली आहे. जवळ जवळ आठ पानांचं हे पत्र आहे. त्यात त्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. वाझेंना खात्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर मंत्र्यांनी काय काय टार्गेट दिलं होतं आणि कोणी कोणी वाझेंना काय काय सांगितलं होतं, याची सर्व धक्कादायक माहिती या पत्रात देण्यात आली आहे.

हॉटेल, बारकडून वसूलीचं टार्गेट

अनिल देशमुख यांनी वाझे यांना हॉटेल, बार आणि इतर अस्थापनांकडून असे मिळून शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते, असं या पत्रात म्हटलं आहे. प्रत्येक महिन्याला ही वसूली करण्याचं वाझेंना टार्गेट देण्यात आलं होतं, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

चौकशीपासून बचावासाठीच परमबीर सिंगांचे खोटे आरोप : अनिल देशमुख

अनिल देशमुख यांनी ट्विट करून परमबीर सिंग यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे, असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे.

संबंधित बातम्या :

Parambir Singh letter : परमबीर सिंगांच्या पत्रात थेट पुरावा, मुख्यमंत्र्यांना कारवाईसाठी अजून काय हवं?, फडणवीसांचा सवाल

Parambir Singh letter | गृहमंत्र्यांच्या ‘वसुली’ आदेशाचा पुरावाच परमबीरसिंहाकडून सादर, पत्रातला 10 नंबरचा मुद्दा वाचलात का?

चौकशीपासून बचावासाठीच परमबीर सिंगांचे खोटे आरोप, अनिल देशमुखांनी आरोप फेटाळले

Anil Deshmukh Parambir Singh | अंबानी आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणी परमबीर सिंहांपर्यंत धागेदोरे, अनिल देशमुखांचा पलटवार

व्हिडीओ पाहा :

MNS Chief Raj Thackeray comment on Ex Mumbai CP Parambir Singh letter to CM Thackeray and corruption

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI