AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परप्रांतीयाची वृद्धाला बेदम मारहाण, राज ठाकरेंनी साधला संवाद, ठाण्यात..

ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलच्या बाहेर खळबळ उडवणारी घटना घडली. एका परप्रांतीय ओला चालकाने वृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण केली. अगदी किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर ओला चालकाने थेट शिव्या देत वृद्धाला मारहाण केली.

परप्रांतीयाची वृद्धाला बेदम मारहाण, राज ठाकरेंनी साधला संवाद, ठाण्यात..
Raj Thackeray call
| Updated on: Jun 11, 2026 | 2:35 PM
Share

ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलच्या बाहेर धक्कादायक घटना घडली. एका परप्रांतीय ओला चालकाने किरकोळ कारणावरून थेट एका वृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही घटना सायंकाळच्या वेळी घडली. वृद्ध व्यक्ती आणि ओला चालक यांच्यात वाद झाला. त्यानंतर ओला चालकाने थेट त्या वृद्ध व्यक्तीला धक्का दिला, त्याच्या कानात लगावली आणि थेट जमिनीवर पाडले. तो ओला चालक फक्त तितक्यावरच थांबला नाही तर तो वृद्ध व्यक्ती जमिनीवरही पडल्यानंतरही तो त्याला मारत होता. एका वृद्ध महिलेने वाचवण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, तो ओला चालक कोणाचेही ऐकत नव्हता. काही लोकांनी या ओला चालकाला थांबवण्याचा प्रयत्नही केला. मात्र तो कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हता. लोकांनी त्याला पकडून ठेवले तरीही त्याचे हात चालत होते. वृद्ध व्यक्तीला त्याने शिवीगाळही केला.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर लोकांमध्ये संतापाचे वातावरण बघायला मिळाले. या ओला चालकावर कोणत्याही परिस्थितीमध्ये कारवाई केली जावी, ही मागणी केली जात होती. यादरम्यानच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट ठाण्याच्या पोलिस आयुक्तांना या प्रकरणात कारवाई करण्याबाबत फोन केला. या ओला चालकावर कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत होती.

यादरम्यानच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात मारहाण झालेल्या वृद्ध व्यक्तीला फोनवरून संवाद साधला. अविनाश जाधव यांनी वृद्ध व्यक्ती आणि राज ठाकरेंचा संवाद करून दिला. ठाण्यातील प्रकरणात मनसेचे नेते अविनाश जाधव आक्रमक भूमिका घेत आहेत. यादरम्यानच आता थेट राज ठाकरे यांनी मारहाण झालेल्या वृद्ध व्यक्तीसोबत संवाद साधला आहे.

आरोपी चालकाविरोधात कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. ठाणे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. मात्र, या घटनेनंतर लोकांमध्ये संतापाचे वातावरण बघत आहे. पुन्हा एकदा परप्रातीयांचा मुद्दा चर्चेत आला. परप्रातीयांची दादागिरी वाढल्याचे सांगितले जात आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा