AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे तब्बल 17 वर्षांनी ‘या’ जिल्ह्याच्या दौऱ्यावर, गाड्यांचा ताफा पोहोचला, जंगी तयारी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रचंड तयारीला लागले आहेत. राज ठाकरे यांनी नुकताच मराठवाड्याचा दौरा केला आहे. यानंतर आता ते विदर्भ दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने ते तब्बल 17 वर्षांनी एका जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

राज ठाकरे तब्बल 17 वर्षांनी 'या' जिल्ह्याच्या दौऱ्यावर, गाड्यांचा ताफा पोहोचला, जंगी तयारी
राज ठाकरे तब्बल 17 वर्षांनी 'या' जिल्ह्याच्या दौऱ्यावर
| Edited By: Chetan Patil | Updated on: Aug 20, 2024 | 9:23 PM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड घडामोडी घडत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. मनसे पक्ष देखील जोरदार तयारीला लागला आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांचा दौरा केला आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांना मराठा आंदोलकांच्या आक्रोशाला देखील सामोरं जावं लागलं आहे. तसेच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बीडमध्ये राज ठाकरे यांच्या गाडीच्या समोर सुपारी फेकत आंदोलन केलं होतं. या सर्व घडामोडींनंतरही राज ठाकरे यांनी आपला दौरा केला. विशेष म्हणजे राज ठाकरे आता पुन्हा सहा दिवासांच्या दौऱ्यावर आहेत. त्यातील पहिला दौरा त्यांचा अशा जिल्ह्यापासून सुरु होतोय, ज्या जिल्ह्यात राज ठाकरे तब्बल 17 वर्षांनी जात आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा गोंदियात दाखल झाला आहे. मात्र राज ठाकरे ट्रेनने गोंदियाला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे 17 वर्षांपूर्वी गोंदियात आले होते. त्यांचा गोंदिया दौऱ्याचा जुना फोटो देखील व्हायरल होतोय. राज ठाकरे 2008 च्या नंतर आता दुसऱ्यांदा गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राज ठाकरे यांचा उद्या 21 ऑगस्टपासून विदर्भ दौरा सुरू होणार आहे. त्यांचा हा दौरा 26 ऑगस्टपर्यंत असणार आहे. त्यांच्या विदर्भ दौऱ्याची सुरुवात उद्यापासून होणार आहे.

राज ठाकरे विदर्भ एक्सप्रेसने गोंदियात पोहोचणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उद्यापासून विदर्भ दौरा सुरू होत असून या दौऱ्याची सुरुवात गोंदियापासून होणार आहे. राज ठाकरे उद्या विदर्भ एक्सप्रेसने गोंदियात पोहोचणार आहे. पण त्याआधी एक दिवसापूर्वीच त्यांचा गाड्यांचा ताफा गोंदिया येथील एका हॉटेल येथे दाखल झाला आहे.

राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यातील मनसे सैनिकांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे. या बॅनरवर राज ठाकरे यांचा ‘महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठा उत्साह बघायला मिळत आहे. या दौऱ्याची तयारी अंतिम टप्प्यात असून गोंदिया शहरातील हॉटेल ग्रँड सिटी या ठिकाणी पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे बैठक घेणार आहेत.

Follow Us
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!
गुंगी गुडिया वादावर शशिकांत शिंदे थेट बोलले; पवारांबाबत केलं मोठं....
Shashikant Shinde | गुंगी गुडिया वादावर शशिकांत शिंदे थेट बोलले; सुनेत्रा पवारांबाबत केलं मोठं विधान, म्हणाले...
शिवसेना चिन्हाचा निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? कोर्टात कपिल सिब्बल...
शिवसेना चिन्हाचा निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? कोर्टात कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; मात्र...
LIVE अपडेट्स! शिवसेना पक्ष, चिन्हाप्रकरणी सुनावणी सुरू; सुरतहून आमदार
LIVE अपडेट्स! शिवसेना पक्ष, चिन्हाप्रकरणी सुनावणी सुरू; सुरतहून आमदार गुवाहटीला गेले हा योगायोग...
केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? यंदा 3 दिवसांचं विशेष...
केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? यंदा 3 दिवसांचं विशेष अधिवेशन, नेमकी कसली चर्चा?
कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार?
मोठी बातमी! कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पहाच