इंदोरीकरांचं काम विसरुन चालेल का? मनसे नेता थेट इंदोरीकरांच्या घरी, अर्धा तास चर्चा

समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी असं वक्तव्य केल्याने इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj controversy) अडचणीत सापडले आहेत.

इंदोरीकरांचं काम विसरुन चालेल का? मनसे नेता थेट इंदोरीकरांच्या घरी, अर्धा तास चर्चा

अहमदनगर : मनसे नेते अभिजीत पानसे यांनी इंदोरीकर महाराजांची भेट घेतली. समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी असं वक्तव्य केल्याने इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj controversy) अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात न्यायालयात खटला सुरु असताना, आज मनसे नेत्याने भेट घेऊन, इंदोरीकर महाराजांशी चर्चा केली. (MNS Abhijit Panse meet Indorikar Maharaj)

संगमनेर तालुक्यातील ओझर या गावी अभिजीत पानसे आणि इंदोरीकर महाराज यांची भेट झाली. इंदोरीकर महाराजांच्या निवास्थानी दोघांमध्ये चर्चा झाली. या दोघांनी बंद दाराआड अर्धातास चर्चा केली. इंदोरीकर गुन्हा दाखल झाल्यावर ही प्रथमच भेट आहे.  मनसे इंदोरीकरांच्या पाठिशी असल्याचं यावरुन स्पष्ट होत आहे.

या भेटीनंतर अभिजीत पानसे म्हणाले, “एखाद्या छोट्या, अनावधाने केलेल्या वाक्यावरुन इतकी टोकाची भूमिका चुकीची आहे. त्यांनी माफीही मागितली आहे.  इंदोरीकर महाराजांचे कार्य सुद्धा महत्वाचे. शाळा चालवत आहेत, समाज प्रबोधनाचं मोठं काम विसरुन चालणार का? पक्ष, राजकारण यापलिकडे आपण पाहायला हवं”

MahaFast News 100 | पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

आज सदिच्छा भेट घेतली असून सरकारने याबाबत काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे, असं अभिजीत पानसे म्हणाले.

इंदोरीकर महाराजांना कोर्टात हजर राहावं लागणार

पुत्रप्राप्तीसाठी केलेल्या विधानावरुन इंदोरीकर महाराजांवर संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल झाला. यानंतर न्यायालयाने इंदोरीकरांना येत्या 7 ऑगस्ट रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत (Court summons Indorikar Maharaj in PCPNDT Case). इंदोरीकर महाराजांना आता स्वत: हजर होत वकीलांमार्फत आपली बाजू मांडावी लागणार आहे.

संबंधित बातम्या 

Indorikar Maharaj | इंदोरीकर महाराजांना कोर्टात हजर राहावंच लागणार!   

मुला-मुलीच्या जन्माबाबत सम-विषम वक्तव्य भोवलं, इंदोरीकर महाराजांवर गुन्हा

Published On - 12:48 pm, Sat, 11 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI