बाळासाहेब, राज ठाकरे यांच्यानंतर अमित ठाकरेंचीही चित्रकला, बाबासाहेबांना अनोखं अभिवादन

अमित ठाकरेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक सुंदर चित्र (Amit Thackeray Dr. BR Ambedkar 129th birth anniversary)  रेखाटले आहे.

बाळासाहेब, राज ठाकरे यांच्यानंतर अमित ठाकरेंचीही चित्रकला, बाबासाहेबांना अनोखं अभिवादन
Follow us
| Updated on: Apr 14, 2020 | 1:45 PM

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 129 व्या जयंतीनिमित्ताने (Amit Thackeray Dr. BR Ambedkar 129th birth anniversary) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र मनसे नेते अमित ठाकरे यांनी अनोख्या पद्धतीने अभिवादन केलं आहे. अमित ठाकरे यांनी स्वत: रेखाटलेले एक चित्र फेसबुक पेजवर पोस्ट केलं आहे. या फोटोला कॅप्शन देताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केलं आहे.

अमित ठाकरेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक सुंदर चित्र (Amit Thackeray Dr. BR Ambedkar 129th birth anniversary)  रेखाटले आहे. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह एक पुस्तकाचे चित्र काढले आहे. क्रांतिसूर्य यांना विनम्र अभिवादन..!! अशी पोस्टही अमित ठाकरेंनी केली आहे. त्यांच्या या पोस्टला हजारो लाईक्सही मिळाल्या आहेत.

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघेही उत्तम व्यंगचित्रकार आहेत. त्या दोघांनी आतापर्यंत अनेक चित्र रेखाटली आहे. त्यानंतर आता अमित ठाकरेही चित्रकलेत रस घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

अमित ठाकरेंनी स्वत: रेखाटलेले पहिलेचे चित्र सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. त्यामुळे सध्या याची अनेक ठिकाणी चर्चा पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे आजोबा आणि वडीलांचे राजकारणासह चित्रकलेचे गुणही अमित ठाकरेंमध्ये उतरले असल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी आदरांजली (Amit Thackeray Dr. BR Ambedkar 129th birth anniversary)  वाहिली.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.