AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रकाश महाजनांनी अखेर संजय राऊतांना जोडले हात, नेमकं काय घडलं?

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर संजय राऊतांनी दिलेल्या प्रतिक्रियेला आता प्रकाश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रकाश महाजनांनी अखेर संजय राऊतांना जोडले हात, नेमकं काय घडलं?
Prakash MahajanImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 16, 2025 | 7:11 PM
Share

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, या भेटीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आता संजय राऊत यांच्या या प्रतिक्रियेला मनसे नेते प्रकाश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले महाजन?

‘मुख्यमंत्री स्वतःहून भेटले काय? आणि राज ठाकरे स्वतःहून भेटले काय? त्यात फरक काय आहे. मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री राहणार आहेत आणि राज ठाकरे हे राज ठाकरेच राहणार आहेत. शब्दाचा छळ करून, आपली निष्ठा दाखवण्यासाठी दोन माणसांनामध्ये कशाला ओढता? असा सवाल यावेळी प्रकाश महाजन यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, महंमद पर्वताला भेटला काय ? पर्वत महंमदला भेटला काय?  महत्वाचे हेच आहे की भेट झाली. मुख्यमंत्री स्वतःहून भेटले तरी ते मुख्यमंत्रीच राहणार आहेत, आणि राज ठाकरे स्वतःहून भेटले तरी ते राज ठाकरेच राहणार आहेत, त्यांच्यात काय बदल होणार आहे? राऊत यांचे बोलणे हे शाळेतील पोरासारखे आहे, कोण आधी कोणाला भेटले?  संजय राऊत यांनी मावळ अपघात झाला त्याच्याविषयी बोलायचे सोडून, कोण कोणाला भेटले असे बोलणे म्हणजे पोरखेळ आहे? असा घणाघात यावेळी महाजन यांनी केला आहे.

सुमार कुवतीची लोक असले की असं होत असतं. संजय राऊत हे मोठे आणि अनुभवी नेते आहेत, मी त्यांना काय बोलावे?  संजय राऊत यांनी दोन महिने गप्प राहिले तर, या महाराष्ट्राचे खूप चांगले होईल. मुख्यमंत्र्यांनी गुप्त बैठक घेतली, हे संजय राऊत कोणत्या आधारावर म्हणतात? मुख्यमंत्री कुठून निघाले कुठे आले याच्या सर्व नोंदी असतात. संजय राऊत यांना वाटत असेल की, बिल्डर हे मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांना भेटले तर त्यांनी नावे जाहीर करावीत. महाराष्ट्रात काही चांगले घडायचे असेल तर त्यावेळी संजय राऊत असे बोलून जातात की सर्व बिघडून जाते,  माझी संजय राऊत यांना हात जोडून विनंती आहे की, त्यांनी दोन महिने मौन बाळगावे महाराष्ट्रात खूप चांगले घडेल, असं महाजन यांनी म्हटलं आहे.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड