AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणुकीच्या घोळामागे नेमका कुणाचा हात? राजू पाटील यांनी थेट नावच सांगितलं, स्वत:च्या मतदारसंघातील मतांचं गणितही सांगितलं

माजी आमदार राजू पाटील यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला. निवडणुकीच्या घोळामागे नेमका कोण आहे, यावरूनही गंभीर आरोप केला.

निवडणुकीच्या घोळामागे नेमका कुणाचा हात? राजू पाटील यांनी थेट नावच सांगितलं, स्वत:च्या मतदारसंघातील मतांचं गणितही सांगितलं
Raju patilImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 04, 2026 | 10:13 AM
Share

मुख्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात विरोधी पक्षातील सर्व राजकीय पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे.  ठाकरे बंधूंनी ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात गर्जना मोर्चाचे आयोजन केलं आहे. या निवडणुकीच्या घोळामागे फक्त ज्ञानेश कुमार नसून यामागे मोदी सरकारचा हात असल्याचा आरोप माजी आमदार राजू पाटील यांनी केला आहे. राजू पाटील यांच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना महाराष्ट्राची’ मोर्चासाठी डोंबिवलीतून मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते ट्रेनने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. हातात ‘गर्जना महाराष्ट्राची’, ‘SIR रद्द करा’चे पोस्टर; प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा जोश पाहायला मिळत आहे. हा आमचा उत्साह नाही, राग आहे; मतदानाचा जो अपमान केलेला आहे, त्याच्या विरोधात आम्ही एकत्र आलो आहोत, असं  राजू पाटील यांनी म्हटलं. तर जनतेच्या मताचा अपमान केला गेला आहे. सर्व मतदार आणि सर्व जनतेने याच्याविरोधात रस्त्यावर उतरले पाहिजे, असं आवाहन राजू पाटील यांनी केलं.

निवडणूक आयोगाच्या  विरोधात वेगळे पुरावे देण्याची आवश्यकता नाही. तीन निवडणूक आयोगांपैकी दोन निवडणूक आयोगांनी अनेक पत्रे दिली आहेत. त्या आधारे निवडणुका घेतल्या असतील तर त्या रद्द केल्या पाहिजेत आणि नव्याने निवडणुका घेतल्या पाहिजेत,  अशी मागणी राजू पाटील यांनी केली आहे. हा जो घोळ झालेला आहे, हा फक्त ज्ञानेश यांचा नव्हे तर मोदी सरकार हाताशी धरून केलेला आहे, असा खळबळजनक आरोप राजू पाटील यांनी केला आहे. माझा मतदारसंघ महाराष्ट्रात एक नंबरचा आहे. त्यामध्ये २ लाख ५५ हजार मतं काढलेली आहेत. त्यामध्ये ९७ टक्के मतदान तिकडचे राहणारे नाही.  ६२ हजारांचा आमदार होता आणि आमच्यामध्ये चारपट मतदान या यादीतून वगळलेल्यांनी त्या वेळेला केले, असा प्रश्न राजू पाटील यांनी उपस्थित केला.

‘आजचा मुद्दा घेऊन आम्ही पुढे चाललोय._गेंड्याच्या कातडीच्या सरकारला फरक पडत नाही, अशी टीका राजू पाटील यांनी केली. मात्र झेनजी जे आंदोलन केलं. लोकांनी उठाव केल्यानंतर नेमकं कसं गुडघ्यावरती यावं लागतं.  हे झेनझी लोकांनी दाखवून दिलेलं आहे. देशाचं राजकारण शंभर टक्के बदललेलं आहे. पुढची भूमिका काय आहे, हेच ऐकायला आम्ही मुंबईत चाललोय. राज ठाकरे आणि सगळे मार्ग दाखवतील, त्याप्रमाणे पुढची दिशा देखील ठरेल, असे राजू पाटील यांनी स्पष्ट केले.

Follow Us
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर मुंबईत मोठं आंदोलन
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट...
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट गुन्हा...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र