‘शेवटचं निवेदन देतोय, स्कायवॉकवरील घाणीचं साम्राज्य हटवा’, मनसेचा केडीएमसीला इशारा

स्कायवॉकची योग्यप्रकारे निगा राखा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करु, असा इशारा कल्याण पूर्वचे मनसेचे विभाग अध्यक्ष विवेक धुमाळ यांनी केडीएमसीला दिला आहे (MNS leader Vivek Dhumal warn to KDMC).

'शेवटचं निवेदन देतोय, स्कायवॉकवरील घाणीचं साम्राज्य हटवा', मनसेचा केडीएमसीला इशारा
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 4:31 PM

ठाणे : कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या स्कायवॉकवर प्रचंड घाणीचं साम्राज्य आहे. अस्वच्छतेमुळे स्कायवॉकवर नेहमी दुर्गंध पसरलेला असतो. त्यामुळे स्कायवॉकवरील घाणीचं साम्राज्य हटवा, स्कायवॉकची योग्यप्रकारे निगा राखा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करु, असा इशारा कल्याण पूर्वचे मनसेचे विभाग अध्यक्ष विवेक धुमाळ यांनी केडीएमसीला दिला आहे (MNS leader Vivek Dhumal warn to KDMC).

विवेक धुमाळ यांनी स्कायवॉकवर फेसबुक लाईव्ह करत केडीएमसीच्या अधिकाऱ्यांना आंदोलनाचा इशारा दिला आहे. याशिवाय त्यांनी याबाबत केडीएमसीचे घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त रामदास कोकरे यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी स्कायवॉकची डागडुजी करुन स्वच्छ करण्याची विनंती केली आहे. त्यानंतर त्यांनी स्कायवॉकवर फेसबुक लाईव्ह करत पुन्हा केडीएमसीला इशारा दिला (MNS leader Vivek Dhumal warn to KDMC).

“कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पादचारी पुलावर अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या पुलावर मलमूत्र, अस्वच्छता, गडदुल्ले यांचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. केडीएमसीच्या उपायुक्तांनी यापुढे स्कायवॉकवरील पुलाच्या स्वच्छतेसाठी काम करु, त्या कामाचा पाठपुरावा करु, असं आश्वासन दिलं आहे”, असं विवेक धुमाळ यांनी फेसबुक लाईव्हमध्ये सांगितलं आहे.

“स्कायवॉकवरुन चालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मोकळा श्वास घेता आला पाहिजे. रात्री उशिरा येणाऱ्या महिलांना सुरक्षित वाटलं पाहिजे. उपायुक्तांनी स्कायवॉकची निगा, डागडुजी आणि स्वच्छता कायमची ठेवावी. स्कायवॉकवर नियमीत लाईट्स आणि पोलीस संरक्षण असावं. महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा भीती वाटायला नको”, असं धुमाळ म्हणाले.

“कल्याण रेल्वे स्टेशनच्या पश्चिम भागात दिपक हॉटेल, दिवाणी न्यायालय आणि तहसील कार्यालयदेखील आहे. त्यामुळे या स्कायवॉकवर नागरिकांची प्रचंड वर्दळ असते. मात्र, तरीदेखील या स्कॉयवॉकची निगा राखली जात नाही. स्कायवॉक हा केडीएमसीच्या हद्दीत आहे. या भागातील वॉर्ड ऑफिसर आणि अधिकारी नेमकं काय करतात? हा मोठा प्रश्न आहे. मी शेवटचं निवेदन देतोय. दोन दिवसात स्कायवॉकची स्वच्छता नाही केली. तर मनसे स्टाईल तीव्र आंदोलन करु”, असा इशारा विवेक धुमाळ यांनी दिला.

विवेक धुमाळ यांनी उपायुक्तांना पाठवलेलं पत्र

हेही वाचा : रेल्वे सुरू करा, मंदिरे उघडा, श्रेयही तुम्हीच घ्या, हवं तर आम्ही ढोल वाजवून स्वागत करू: नांदगावकर

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.