AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसेचे पुढील टार्गेट कोण? राज ठाकरे यांचे ते ‘सात’ शिलेदार काढणार ‘जागर’ यात्रा

मुंबई गोवा महामार्गावर मनसेचे आंदोलन सुरूच आहे. मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गणपतीपूर्वी रस्त्याचे काम पूर्ण होईल असे आश्वासन दिले असले तरी मनसे या कामावर लक्ष ठेवून असणारा आहे. त्याची जबाबदारी मनसेने सात नेत्यांवर सोपविली आहे. हे सात नेते आता जागर यात्रा काढणार आहेत.

मनसेचे पुढील टार्गेट कोण? राज ठाकरे यांचे ते 'सात' शिलेदार काढणार 'जागर' यात्रा
MNS Raj Thackeray
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Aug 26, 2023 | 3:05 PM
Share

मुंबई : 26 ऑगस्ट 2024 | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई – गोवा महामार्गावरून राज्यातील युती सरकारवर जोरदार टीका केली होती. मुंबई गोवा महामार्गावर आतापर्यंत १५,६६६ कोटी रुपये खर्च झाले. 13 वर्र्ष काम सुरु आहे. तरीही रस्ता होत नाही? या पैशांमधून काहींच्या तुंबड्या भरल्या गेल्या. कोकणाचा विकास होऊ नये म्हणून कोणी प्रयत्न करतंय का? असा थेट सवाल त्यांनी केला होता. राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मनसैनिकांनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम करणाऱ्या चेतक सन्नी कंपनीची तोडफोड केली. मनसैनिकांच्या या आंदोलनानंतर आता मनसे नेतेही ‘या’ रणांगणात उतरणार आहेत. मनसेचे सात नेते कोकणात जागर यात्रा काढणार आहेत. या जागर यात्रेत हे सात नेते मुंबई – गोवा महामार्गाचा भांडाफोड करणार आहेत. एकूण सात टप्प्यांमध्ये ही यात्रा पार पडणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महत्त्वाच्या सात नेत्यांवर ही जाबाबदारी सोपविली आहे. यामध्ये अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, अभिजीत पानसे, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत आणि संदीप देशपांडे यांचा समावेश आहे. ही यात्रा संपल्यानंतर राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने या यात्रेची सांगता होणार आहे.

मनसेच्या या जागर यात्रेची अधिक माहिती देताना सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सांगितले, जागर यात्रेसाठी आम्ही आज निघणार आहोत. जाता जाता फेसबुक पेजवरून लाईव्ह करणार आहे. मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी काय कामे चलू आहेत, कोणती कामे चालली आहेत ते आम्ही दाखवून देऊ. त्यामध्ये कसं थूकपट्टी लावून काम केले जाते हे ही आम्ही जनतेसमोर आणू.

नाचता येईना अंगण वाकडे

भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आम्हाला आंदोलन कसं करायचं ते शिकवू नये. कसं आंदोलन करायचं ते आम्हाला माहित आहे. कुठे, कुठल्या पद्धतीने आंदोलन करायचं हे त्यांच्याकडून शिकण्याची गरज नाही. त्यांची अवस्था नाचता येईना अंगण वाकडे अशी आहे.

मनसेच्या आंदोलनामुळे मुंबई गोवा महामाग्राचे काम रखडले असे ते म्हणतात. पण, आम्हाला दोष देऊन स्वताचे पाप लपवू नका. झालेल्या कामामध्ये भेगा पडल्या. ते ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळेच झाले की भिकारी कॉन्ट्रॅक्टदारामुळे झाले असा सवाल त्यांनी केला.

नागरिकांचा एकत्र करण्याचे काम

कुणी बहिरा झाला असेल तर आपण त्यांच्याशी मोठ्याने बोलतो. तसेच काही लोक बहिरे झाले असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या कानाखाली आवाज काढेल, असा इशाराही त्यांनी दिला. आम्ही जागर यात्रा सुरू केली आहे ते नित्कृष्ठ दर्जाचे झालेले काम जनतेपुढे मांडण्यासाठी आहे. जागर मांडून नागरिकांचा एकत्र करण्याचे काम ही यात्रा करणार आहे, असेही देशपांडे यांनी सांगितले.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?