AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

याद राखा… तर तुमचे गाल अन् आमचा हात, मनसेचा इशारा; रिक्षा आंदोलन उद्ध्वस्त…

रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून मनसे आक्रमक झाली आहे. परिवहन मंत्र्यांच्या निर्णयाविरोधात रिक्षा संघटनांनी संप पुकारल्यास सर्वसामान्यांना त्रास होईल, असे मनसेने म्हटले आहे. 'तुमचे गाल अन् आमचा हात' या शब्दांत मनसेने संपकरी संघटनांना कडक इशारा दिला आहे. मराठीच्या मुद्द्यावर आंदोलन केल्यास मनसे शांत बसणार नाही.

याद राखा... तर तुमचे गाल अन् आमचा हात, मनसेचा इशारा; रिक्षा आंदोलन उद्ध्वस्त...
Auto RickshawImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 24, 2026 | 6:04 PM
Share

रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी ‘मराठी अनिवार्य’ करण्याच्या निर्णयावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या निर्णयाला काही रिक्षा संघटनांनी विरोध करत संपाचं हत्यार उपसलंय. मात्र, या संपाविरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. “मराठीच्या मुद्द्यावरून जर संप पुकारून सर्वसामान्यांना वेठीस धरलं, तर याद राखा,” असा सज्जड दम मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला आहे. “तुमचे गाल आणि आमचा हात” या शब्दांत त्यांनी संपकरी संघटनांना ठणकावून सांगितलंय.

परिवहन विभागाने रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषेची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिल्यानंतर, परप्रांतीय बहुल असलेल्या काही रिक्षा संघटनांनी ४ तारखेला संपाचा इशारा दिला आहे. या संपाच्या इशाऱ्यामुळे मनसे आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असून, कल्याणमध्ये मनसेने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

15 लाख रिक्षा येणार कुठून?

मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी संप पुकारणाऱ्या नेत्यांच्या अभ्यासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “काही लोक 4 तारखेला 15 लाख रिक्षा घेऊन आंदोलनाचा इशारा देत आहेत. मुळात ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली मिळून 4 लाख रिक्षा आहेत. मग हे उरलेले 11 लाख लोक काय यूपी-बिहारमधून येणार आहेत का? असा खोचक सवाल भोईर यांनी विचारला आहे. तसेच, जर बाहेरून लोक येणार असतील, तर त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी मनसे ठाम असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

तर गाठ आमच्याशी!

रिक्षा संघटनांच्या संपावर बोलताना उल्हास भोईर म्हणाले की, “मराठी भाषेच्या निर्णयाला विरोध करून जर मराठी माणसाला त्रास दिला, तर तो आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. मराठी माणसावर अन्याय झाला तर ‘आमचा हात आणि त्यांचे गाल’ हे ब्रीदवाक्य आम्ही सार्थ ठरवू.” इतिहासाची करून दिली आठवण कल्याण-डोंबिवलीकरांनी यापूर्वी रेल्वे भरतीवेळी झालेल्या अन्यायाविरोधात मोठे आंदोलन उभे केले होते, याची आठवण करून देत भोईर यांनी इशारा दिला की, “येत्या 4 तारखेला जर मराठी अस्मितेवर आणि माणसावर अन्याय झाला, तर ते आंदोलन मोडून काढण्यासाठी कल्याण-डोंबिवलीचा वाटा सर्वात मोठा असेल.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड