AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालघरमध्ये जमावाकडून चोर समजून 3 प्रवाशांची हत्या, 100 जण ताब्यात

चोर समजून तीन प्रवाशांची हत्या (Mob lynching in Palghar) केल्याची धक्कादायक घटना पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिचंले गावात घडली.

पालघरमध्ये जमावाकडून चोर समजून 3 प्रवाशांची हत्या, 100 जण ताब्यात
| Updated on: Apr 17, 2020 | 4:16 PM
Share

पालघर : चोर समजून तीन प्रवाशांची हत्या केल्याची (Mob lynching in Palghar) धक्कादायक घटना पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिचंले गावात घडली. याप्रकरणी पोलिसांनी 100 हल्लेखोरांना ताब्यात घेतलं आहे. हत्या झालेल्यांपैकी दोन साधू तर एक वाहनचालक आहे. आरोपींनी पोलिसांवरही हल्ला केला. यात पोलिसांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं (Mob lynching in Palghar).

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद आहेत. मात्र, या लॉकडाऊनदरम्यान पालघर जिल्ह्यात रात्रीच्यावेळी तीन ते चार सराईत चोर फिरत असल्याची अफवा पसरली. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये धडकी भरली. यातूनच रात्रीच्यावेळी गावकऱ्यांनी एकत्र येत जागरण करण्याचा निर्णय घेतला आणि चोर सापडल्यास त्याला बेदम मारहाण करायची असं ठरवलं.

दरम्यान, गुरुवारी रात्री उशिरा एक इको गाडी दाभाडी-खानवेल मार्गावरुन जात होती. या गाडीत वाहनचालक पकडून तीन जण होते. यापैकी दोन जण साधू होते. ते नाशिकच्या त्र्यंबकेश्वरला जात होते. मात्र, दाभाडी-खानवेल मार्गावर शंभर जणांच्या जमावाने त्यांची गाडी अडवली. त्यांची पूर्णपणे विचारपूस न करताच चोर समजून त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्यावर दगडफेक आणि लाठ्यांचा हल्ला केला. या हल्ल्यात तिघांचा दूर्देवी मृत्यू झाला.

पालघरच्या कासा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रचंड प्रयत्न केला. मात्र, जमावाने पोलिसांवरही हल्ला केला. पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. अखेर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करत सर्वांना ताब्यात घेतलं. या घटनेप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र, कोणत्याही अफवांना बळी पडू नका, असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या :

सडपातळ महिलांना फटीतून ‘एक्साईज’च्या गोदामात पाठवलं, वर्ध्यात दारुच्या 202 पेट्या चोरीला

एपीएमसी मार्केटमधील व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह, कामगार, वाहतूकदारांमध्ये भीतीचे वातावरण

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.