AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फिरत्या विक्री केंद्राने बेरोजगारीवर मात; येवल्यात यशस्वी उद्योजक घडविण्यासाठी वाहनांचे वाटप

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून बेरोजगारांना व्यवसाय सुरू करण्यासाठी फिरत्या विक्री केंद्रासाठी वाहनांचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

फिरत्या विक्री केंद्राने बेरोजगारीवर मात; येवल्यात यशस्वी उद्योजक घडविण्यासाठी वाहनांचे वाटप
येवल्यात बेरोजरागारांना विक्री केंद्राचे वाहन वाटप करण्यात आले.
| Edited By: | Updated on: Nov 14, 2021 | 4:43 PM
Share

नाशिकः बेरोजगारी आहे. कोरोनाने अनेकांना संकटात आणले. कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या. मात्र, हेच तुणतुणे वाजवत किती दिवस बसायचे. हे ध्यानात घेत आता मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून बेरोजगारांना व्यवसाय सुरू करण्यासाठी फिरत्या विक्री केंद्रासाठी वाहनांचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या सौजन्याने बेरोजरागारांना फिरत्या विक्री केंद्रासाठी वाहनांचे वाटप करण्यात आले. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रादेशिक व्यवस्थापक भगवान सुरसे, मुख्य प्रबंधक मनीष कुमार गुप्ता, शाखा प्रबंधक मोहम्मद साबिर,समन्वयक सचिन पवार उपस्थित होते. या कार्यक्रमात पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेतून सावरण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत बेरोजगार युवकांना स्वत:च्या व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने अथक प्रयत्नातून फिरत्या विक्री केंद्रासाठी वाहन वाटपाचे हे उद्दिष्ट साकार झाले आहे. अथक परिश्रम आणि खडतर मेहनतीतूनच यशस्वी उद्योजक घडत असतो. ही योजना अमलात आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा फायदा होईल यादृष्टीने नियमात बसवून योजना अमलात आणली आहे.

10 लाख किमतीपर्यंतचे वाहन

पालकमंत्री भुजबळ म्हणाले, या योजनेच्या माध्यमातून 6 लाख ते 10 लाखांपर्यंत किमतीचे मालवाहतुकीसाठी वाहन उपलब्ध होणार आहे. लाभार्थ्याला वाहनाच्या किमतीच्या 5 टक्के रक्कम सुरुवातीला भरावी लागते. यावर शासनाची 15 टक्केपासून 35 टक्केपर्यंत सबसिडी मिळते. कर्जाच्या रकमेची 5 वर्षात परतफेड सुलभ हप्त्याने करता येते. या योजनेचा जास्तीत जास्त गरजुंनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी केले.

16 लाभार्थ्यांना चाव्या, 25 जणांना मंजुरी पत्र

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात आनंदा दुनबळे, वेता बोथरा, पुजा जाधव, बळीराम जाधव, दत्तात्रय पगारे, सुरेश गोरडे, कुणाल वाकचौरे, योगेश वाघ, रोहिनी महानुभाव, काशिनाथ खळे, सविता लासुरे, नीलेश वाकळे, सरला रोकडे, मेघाली खरात, राकेश जगताप व सायली जमादार या 16 लाभार्थ्यांना मालवाहतूक वाहनांच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. तर 25 लाभार्थ्यांना वाहन मंजुरीचे पत्र प्रदान करण्यात आले. (Mobile sales outlets beat unemployment; Efforts are underway to develop successful entrepreneurs in Yeola)

इतर बातम्याः

अन्यायाविरोधात लढणारा आदिवासी नक्षली नाही, शिवरायांचे राज्य भोसल्यांचे नव्हे तर ते रयतेचे हिंदवी स्वराज्य, शरद पवारांचे प्रतिपादन

देशभरातील बुद्ध विहारांचे संघटन सुरू; नाशिकमध्ये पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनात विविध ठराव संमत

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.