‘धर्म म्हणजे स्वयंपाकघर नाही’, सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

"पुरुष जी कामं करु शकतात, ती महिला करु शकतात आणि पुरुष जी कामं करु शकत नाही ती कामंही महिला करु शकते. महिलांना मोकळीक दिली तर सर्वांचा उद्धार करु शकते. सगळ्यांचं चांगलं होईल याचा विचार करुन महिला काम करते", असं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडलं.

'धर्म म्हणजे स्वयंपाकघर नाही', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?
सरसंघचालक मोहन भागवत
Follow us
| Updated on: Sep 10, 2024 | 8:06 PM

नागपुरात धरमपेठ महिला बॅंकेत गोळवलकर गुरुजी यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थिती लावली. यावेळी मोहन भागवत यांनी भूमिका मांडताना धर्माबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं. ‘धर्म म्हणजे स्वयंपाकघर नाही तर धर्म म्हणजे समाजाचं काम करणं होय, असं मोहन भागवत आपल्या भाषणात म्हणाले. “पुरुष जी कामं करु शकतात, ती महिला करु शकतात आणि पुरुष जी कामं करु शकत नाही ती कामंही महिला करु शकते. महिलांना मोकळीक दिली तर सर्वांचा उद्धार करु शकते. सगळ्यांचं चांगलं होईल याचा विचार करुन महिला काम करते. अवघ्या 30 वर्षांत ही संस्था मोठी झालीय. कारण या संस्थेत मातृशक्तीचा वाटा आहे. गोळवलकर गुरुजींच्या तैलचीत्राचं अनावरण एक चांगली गोष्ट आहे”, अशी भूमिका मोहन भागवत यांनी मांडली.

“विद्यार्थी असताना दत्तोपंत ठेंगडी हे गोळवलकर गुरुजींच्या घरी राहायचे. मी द्वितीय वर्षे करत होतो. तेव्हा गोळवलकर गुरुजींचं शिक्षण बौद्धीक असायचं. तेव्हा वर्गात पंखा नसायचा. पहिल्या बंदीनंतर गोळवलकर गुरुजी यांनी संघाचं काम शुन्यातून उभं केलं भारतातलं शिक्षण तीन ट्रिलियन डॅालर्स. काही लोकं शिक्षण उद्योग म्हणून करतात. पण शिक्षण म्हणजे ज्ञान द्यायचं असतं”, असं मोहन भागवत म्हणाले.

“पूर्वी लोक म्हणायचे शेती आमचा धर्म. धर्म म्हणजे स्वयंपाकघर नाही. धर्म म्हणजे समाजाचं काम करणं”, असं मोहन भागवत म्हणाले. “संघ चालतो. कारण संघाला काही मिळवायचं नाही. संघाला प्रभावी गट निर्माण करायचा आहे. संघाला समाज संघटित करायचा आहे. समाज संघटित असायला हवा”, असं देखील मत मोहन भागवत यांनी यावेळी मांडलं.

मोहन भागवत आणखी काय म्हणाले?

“एक व्यक्ती लेखकाला घरांची योजना सांगत होता. लेखकांच्या घरांची कॅालनी बांधायची योजना करोडोंची. खिशात रिक्षाला पैसे नाहीत. लेखकांसाठी करोडोच्या घरांची योजना सांगणारा घरी जाताना रिक्षासाठी दोन रुपये मागतो”, असं मोहन भागवत यावेळी म्हणाले.

“नियमाचं पालन केलं पाहिजे. सरसंघचालकांना वैधानिक अधिकार नाही. पण त्यांचा शब्द कोणी खाली पडू देत नाही. पण गोळवलकर गुरुजी स्थानिक संघचालकांना विचारायचे. संघाचं कार्यालय सरसंघचालक असेपर्यंत असते, त्यानंतर दुसऱ्या संरसंघचालकाच्या नावावर. आणीबाणीत आम्ही भूमिगत होतो. धर्म आचारामुळे वाढतो. उपदेशानं नाही”, असंही मोहन भागवत म्हणाले.

TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.