Monsoon Alert : महाराष्ट्रभर पावसाची शक्यता, रायगड, रत्नागिरीत रेड अलर्ट तर मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा

उद्या मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला गेलाय.

Monsoon Alert : महाराष्ट्रभर पावसाची शक्यता, रायगड, रत्नागिरीत रेड अलर्ट तर मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा
काल दिवसभर रिमझिम कोसळणाऱ्या पावसाने आज सकाळपासूनच जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी भरले असून रेल्वे रुळावरही पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबई : जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यातील अनेक भागात पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने उद्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट दिला आहे. उद्या मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला गेलाय. हवामान खात्याने मुंबईतही अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अतिवृषीचे ढग दक्षिणेकडे वळल्यामुळे मुंबईचा रेड अलर्ट आता ऑरेंज अलर्टमध्ये बदलण्यात आल्याची माहितीही हवामान विभागाने दिलीय. (Rain forecast in Maharashtra, red alert in Raigad, Ratnagiri and warning of heavy rains in Mumbai)

कोकण आणि गोव्यात काय स्थिती?

13 जून म्हणजे रविवारी कोकण आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाच पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. त्याचबरोबर किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

मध्य महाराष्ट्रात काय स्थिती राहणार?

मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं नोंदवलाय.

मराठवाड्यात काय स्थिती राहणार?

मराठवाड्यात 13 जून म्हणजे रविवारी बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवलीय.

विदर्भात काय स्थिती राहणार?

विदर्भातही बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह, विजांचा कडकडाटही होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय.

होसाळीकरांचा शनिवारी सकाळचा अंदाज

येत्या चार ते पाच दिवसांत मुंबई आणि कोकण परिसरात आणखी मुसळधार पाऊस (Rain) पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या दोन्ही परिसरात हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबच्या पट्टा तयार झाल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर त्याचा परिणाम पाहायला मिळेल. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसांत किनारपट्टीलगत असणाऱ्या भागांमध्ये जोरदार पाऊस पडेल. त्यादृष्टीने मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या : 

Video : कृषीमंत्री दादा भुसेंनी धरली चाड्यावर मूठ, तर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंनीही केली पेरणी!

Weather Alert: रायगड, नवी मुंबईत अतिवृष्टीचा धोका टळला; ठाण्यात हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

Rain forecast in Maharashtra, red alert in Raigad, Ratnagiri and warning of heavy rains in Mumbai

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI