AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Alert: रायगड, नवी मुंबईत अतिवृष्टीचा धोका टळला; ठाण्यात हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

या दोन दिवसांमध्ये नवी मुंबई आणि रायगडमध्ये 200 मिमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले होते. | Rain in Navi Mumbai

Weather Alert: रायगड, नवी मुंबईत अतिवृष्टीचा धोका टळला; ठाण्यात हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा
प्रतिकात्मक फोटो
| Edited By: | Updated on: Jun 12, 2021 | 7:38 AM
Share

नवी मुंबई: रायगड आणि नवी मुंबई परिसराला असलेला अतिवृष्टीचा धोका टळला आहे. कारण, पनवेल आणि नवी मुंबई परिसरात शनिवार सकाळपासून रिमझिम पाऊस बरसत आहे. तर रायगडमध्येही तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain) बरसत आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 34 मिमी इतका पाऊस झाला आहे. तर पनवेलमध्ये 29.30 मिमी आणि नवी मुंबईत पावसाची सरासरी 45 मिमी इतकी आहे. (Weather and Rain forecast for Navi Mumbai and Raigad Region)

हवामान खात्याच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे 10 आणि 11 जूनला नवी मुंबईत अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. तर रायगडमध्येही 10 आणि 11 जूनला वेगाने वारे वाहतील, असा इशारा देण्यात आला होता. या दोन दिवसांमध्ये नवी मुंबई आणि रायगडमध्ये 200 मिमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले होते.

रायगड जिल्हा हा ब्रेक द चेन नियमावलीत चौथ्या स्तरावर असल्याने शनिवार आणि रविवारी जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन असेल. परिस्थिती सुधारण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.

ठाण्यात सतर्कतेचा इशारा

सलग दोन ते तीन दिवस पावसाने मोठ्या प्रमाणात ठाणे शहरात देखील हजेरी लावली आहे. तसेच ते येत्या तीन ते चार दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे.

तर काही ठिकाणी सखल भागात पाणी साचायला देखील सुरवात झाली आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत तुरळक घट दिसून येत आहे. तसेच हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.

संबंधित बातम्या:

Mumbai Rain Live Updates | मान्सूनचे आगमन, मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस

मुंबईसह उपनगरात 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा, बीएमसीकडून ‘या’ उपाययोजना

मुंबईतील नाले, गटारांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीचा वॉच, दंडात्मक कारवाई होणार

(Weather and Rain forecast for Navi Mumbai and Raigad Region)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.