सचिन अहिर यांच्यानंतर शिंदेंकडून ठाकरेंना आणखी मोठा धक्का? तब्बल 14 आमदार…धक्कादायक माहिती समोर!
महायुतीकडे बहुमत असल्याने अहिर हे 1 जुलै रोजी विधानपरिषदेचे उपसभापती म्हणून निवडले जातील. दरम्यान अगोदर सहा खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता ऑपरेशन टायगर 2.0 मध्ये सचिन अहिर यांनीही ठाकरेंची साथ सोडली आहे.

Sachin Ahir Join Eknath Shinde Shivsena : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आमदार आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे आणि मुंबईत मोठं राजकीय प्रस्थ असणारे सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीकडे बहुमत असल्याने अहिर हे 1 जुलै रोजी विधानपरिषदेचे उपसभापती म्हणून निवडले जातील. दरम्यान अगोदर सहा खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता ऑपरेशन टायगर 2.0 मध्ये सचिन अहिर यांनीही ठाकरेंची साथ सोडली आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता तिसऱ्या आणि चौथ्या ऑपरेशन टायगरची चर्चा होत आहे. भविष्यात आणखी काही आमदार शिंदे यांच्या पक्षात दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसा दावा शिंदे यांच्या एका आमदाराने केला आहे.
लवकरच काही आमदार आणि नगरसेवक
निलेश राणे सचिन आहीर होते म्हणूनच आदित्य ठाकरे हे वरळीतून निवडून यायचे. सचिन आहीर हे वरळीचे माजी आमदार होते. आता सचिन आहिर हेच आमच्य पक्षात आल्यामुळे आदित्य ठाकरेंना झोप लागणार नाही. त्यांचे भविष्यात निवडून येणे मुश्कील आहे, असा टोला निलेश राणे यांनी लगावला. आमच्याकडे येणाऱ्यांची यादी मोठी आहे. ही संख्या मोठी आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते आहेत. महाराष्ट्रातील जेवढे लोकप्रतिनिधी आहेत ते एकनाथ शिंदे यांचे नेतृत्त्व मान्य करतात. कारण शिंदे साहेब हे 18 तास काम करणारे नेते आहेत. कोणत्याही एका नेत्याचे नाव घेता येणार नाही. कारण काही आमदार आणि काही नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. महाराष्ट्राला लवकरच गोड बातमी मिळेल. 40 ते 45 नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. तर 14 आमदार आमच्या संपर्कात आहेत. एकनाथ शिंदे यांनी वेळ दिल्यानंतर ऑपरेशन तीन आणि ऑपरेशन चारची सुरुवात होईल.