AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिन अहिर यांनी सोडली साथ, आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Aaditya Thackeray on Sachin Ahir : सचिन अहिर हे आमदार आदित्य ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात. आज सचिन अहिर यांनी पक्ष सोडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे.

सचिन अहिर यांनी सोडली साथ, आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Aaditya Thackeray on Sachin AhirImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 30, 2026 | 2:44 PM
Share

सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असून ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. अहिर यांनी शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज भरला. सचिन आहिर यांनी अर्ज भरला त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते. सचिन अहिर हे आमदार आदित्य ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात. आज सचिन अहिर यांनी पक्ष सोडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

सचिन अहिर यांनी पक्ष सोडल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘गेले चार वर्षे आम्ही पाहतोय की, ज्यांना सगळं काही मिळतं ते स्वत:च्या स्वार्थासाठी निघून जात आहेत. हे आम्ही गेल्या काही काळापासून पाहत आहे, त्यामुळे यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही नाही. वरळी-शिवडी हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. आमचं तिकडचं काम बोलतं, त्यामुळे कुणी येण्याने किंवा जाण्याने धक्का काही बसत नाही. मात्र एकच दुर्दैवाच आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं, त्यांना अजून काय पाहिजे? ते असही नाही म्हणू शकत की आदित्य ठाकरे भेटतच नाहीत. ते स्वत: आमदार आहेत, त्यांच्या मुलीला प्रभाग समिती दिलेली आहे. आमदार सेनेत पद आहे, शिवसेनेत उपनेतेपद आहे. अजून तुम्हाला काय पाहिजे असा प्रश्न पडत आहे. आम्ही यांना काही कमी दिलेलं नाही, आम्ही रोज तुमच्या आरत्या करायच्या का? कोणी जाण्याने काहीही फरक पडत नाही.’

हे ऑपरेशन टायगर नव्हे, ऑपरेशन देवेंद्र फडणवीस – आदित्य ठाकरे

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, हे ऑपरेशन टायगर मुळीच नाही. हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे. हे अभ्यासातून लक्षात आलं आहे. हे ऑपरेशन फडणवीस आहे. हे लक्षात आलं आहे. सकाळी त्यांनी मेसेज पाठवला वरळीतून उभा राहणार नाही. हे म्हणण्याच्या गोष्टी आहेत. उभे राहिले तरी काही फरक पडत नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि संघाच्या कार्यकर्त्यांना सवाल आहे, आज उपसभापती डोक्यावर बसला. तुमच्यातील का नाही बसला. हा भाजपने विचार केला पाहिजे. हे ऑपरेशन फडणवीस आहे.

कारवाई करणार

आदित्य ठाकरे यांनी अहिर यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देताना म्हटले की, ‘जी कारवाई असेल ती आम्ही करू. भाजपचे कार्यकर्ते घरदार सोडून काम करतात. त्यांना उच्च पद का मिळत नाही. सत्तेपासून दूर का ठेवत आहात. एक तर तुमच्याकडे टॅलेंट नसेल किंवा तुम्हाला कार्यकर्त्यांना पुढे आणायचे नसेल. पहिली आमदारकी सुनील शिंदेंना मिळाली होती. ज्यांना ज्यांना शब्द दिला ते पाळले. खासदारकी, आमदारकी नगरसेवकपद दिलं. तुम्ही निष्ठेचा शब्द पाळला का. तुम्ही तो शब्द पाळला नाही.

Follow Us
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका