‘ये दिल मांगे मोर’, कारगिल विजय दिवसानिमित्त छत्रपती संभाजीराजेंची फेसबुक पोस्ट

भारतात आज (26 जुलै) कारगिल विजय दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जात आहे (Sambhajiraje Chhatrapati Facebook post on Kargil Vijay Divas).

'ये दिल मांगे मोर', कारगिल विजय दिवसानिमित्त छत्रपती संभाजीराजेंची फेसबुक पोस्ट
Follow us
| Updated on: Oct 11, 2020 | 12:53 PM

मुंबई : भारतात आज (26 जुलै) कारगिल विजय दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जात आहे (Sambhajiraje Chhatrapati Facebook post on Kargil Vijay Divas). तसेच या कारगिल युद्धात निधन झालेल्या सर्व जवानांना देशातील जनतेकडून अभिवादन करण्यात येत आहे. याच दिनानिमित्त खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भारतीय सैन्यांबद्दल कौतुक केले आहे (Sambhajiraje Chhatrapati Facebook post on Kargil Vijay Divas).

छत्रपती संभाजीराजे यांची फेसबुक पोस्ट

“‘ये दिल मांगे मोर’ असा उत्स्फूर्त ध्येयवाद घेऊन आपल्या सैन्याने पाकिस्तानवर विजय मिळवला. सुदैवाने जम्मू काश्मीर मधला हा संपूर्ण सीमा परिसर स्वतः पाहिला आहे. इतक्या कठीण परिस्थितीत आपल्या जिगरबाज सैन्याने लढा दिला आणि विजय मिळवला हे एक आश्चर्य आहे. भौगोलिक, सामरिक दृष्ट्या शत्रू मजबूत स्थितीत असून सुद्धा आपल्या वीरांनी सर्व अडचणींवर मात करून विजयी तिरंगा फडकवला. मला हिमालयातला हा परिसर फिरत असताना सह्याद्रीची अन शिवछत्रपतींच्या रणमर्द मावळ्यांची आठवण आली. मातृभूमीच्या रक्षणार्थ सर्वस्व समर्पित करणाऱ्या त्या शूर वीरांना मनोमन नमन करतो”, असं संभाजीराजेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

‘ये दिल मांगे मोर’ असा उत्स्फूर्त ध्येयवाद घेऊन आपल्या सैन्याने पाकिस्तान वर विजय मिळवला. सुदैवाने जम्मू काश्मीर मधला हा…

Posted by Yuvraj Sambhajiraje Chhatrapati on Sunday, 26 July 2020

“आज कारगिल ‘विजय दिवस’ ला 21 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने पुन्हा नव्याने ‘ये दिल मांगे मोर’ असे म्हणावे वाटत आहे. कारण आपला बराच भूभाग शत्रूच्या ताब्यात आहे. चीन आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी भारताचा भूभाग व्यापला आहे. तो चिनव्याप्त अन पाकव्याप्त भूभाग मराठा लाईट इंफंट्रीचे प्रमुख आणि जनरल पंनू जी यांनी मला दाखवला आहे. ते तेंव्हा या परिसराचे कोअर कमांडर होते. योगायोग म्हणजे दोन दिवसानंतर त्यावेळचे संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे हेही त्या परिसराच्या दौऱ्यावर आले होते”, असंही संभाजीराजे म्हणाले.

“एक गोष्ट सांगावी वाटते की, देशाच्या जवळपास सर्व सीमांवर जाण्याची, त्यांच्या समवेत राहून परिस्थितीचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. मला स्वतःला सैन्य दलांच्या वर्दीचे प्रचंड आकर्षण सुद्धा आहे. बेळगावच्या मराठा लाईट इंफंट्रीच्या रेजिमेंटल सेंटरमध्ये कमांडोचे प्रशिक्षण सुद्धा घेतले आहे. छत्रपती घराण्याचा वारस असल्यामुळे भारतीय सेनादलांमध्ये अमच्याविषयी एक आदराची भावना आहे. शेकडो वर्षांचा ऋणानुबंधाचा धागा आजही छत्रपती घराण्याने आणि सैन्य दलांनी सुद्धा जपला आहे.”, असंही संभाजीराजेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

संबंधित बातम्या :

Kargil Vijay Diwas : भारताने मैत्रीचा हात पुढे केला, पण पाकिस्तानने पाठीत खंजीर खुपसला : पंतप्रधान मोदी

‘कारगिल युद्धात अख्खा देश जवानांसोबत होता, आता आम्ही सर्व जवान आशा वर्कर्ससोबत’

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.