अमेरिकेत पीएचडी, मुंबईतील हॉटेलमध्ये येऊन थेट लैगिंक अत्याचार, वरिष्ठ अधिकाऱ्याचा लेक गोत्यात, मुंबई हादरली…
Mumbai Crime : मुंबईतील वांद्रा भागातील एका हॉटेलमध्ये खळबळ उडवणारा प्रकार घडला. ज्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. अमेरिकेत पीएचडी केलेल्या मुलाचा कारनामा पुढे आला असून बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आलीये.

अमेरिकेत पीएचडी करणाऱ्या 29 वर्षीय मुलीने बलात्काराचा गुन्हा मुंबईतील वांद्रे पोलिस ठाण्यात दाखल केला. यासोबतच तिने काही धक्कादायक अशी गंभीर आरोप केली. तिने हा गुन्हा 31 वर्षीय तिचा सहकारी असलेल्या मुलाविरोधात दाखल केला. वांद्रयातील आलिशान हॉटेलमध्ये बोलावून आपल्यावर बलात्कार करण्यात आल्याचे तिने आपल्या तक्रारीत म्हटले. ज्या मुलावर गुन्हा दाखल झाला तो देखील अमेरिकेत पीएचडी करतो. मुलीने तिच्या तक्रारीत म्हटले की, लग्नाचे आमिष दाखवून पीएडी संशोधक मुलगा तिच्यावर बलात्कार करत असे. मुलाने तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. याबाबत पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
अमेरिकेत पीएचडी भारतात येऊन कारनामा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत पीएचडी करणाऱ्या मुलाने मुलीला अभ्यासासाठी एका हॉटेलमध्ये बोलावले होते. यादरम्यान तो मुलीसोबत चुकीचा वागला. आरोपी हा मुंबईतील लोअर परेल भागात राहतो तर मुलगी माहिम भागात. आरोपीचे वडील एका मोठ्या बॅंकेत वरिष्ठ पदावर असल्याची माहिती मिळतंय. मुलीने पोलिसात तक्रार दिल्यानंतर हे सर्व प्रकरण उघडकीस आले.
मुलीने घेतली आईसोबत पोलिस ठाण्यात धाव
एफआयआरनुसार, ही बलात्काराची घटना 1 जानेवारी ते 12 जून दरम्यान वांद्रेतील हॉटेलमध्ये घडली. हेच नाही तर दोघे अमेरिकेत राहत असतानाही आरोपीने मुलीचे लैगिंक शोषण केले. आरोपी इलिनॉय विद्यापीठातून अर्बाना-चॅम्पेन पीएचडी करत आहे. दोघांची ओळख झाली आणि अभ्यासाबद्दल त्यांची चर्चा होत. काही दिवसांपूर्वी पीडित मुलीला समजले की, आरोपी दुसऱ्या मुलीसोबत लग्नाबद्दल बोलत आहे.
आरोपीचे वडील मोठ्या बॅंकेत वरिष्ठ पदावर कार्यरत
जेव्हा तिने याबद्दल त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तिच्यावर हल्ला करत धमकावले. हेच नाही तर खासगी फोटो लीक करण्याची धमकी देखील दिली. शेवटी निराश झालेल्या मुलीने सर्वप्रकार आपल्या आईला सांगितला आणि मुलगी थेट आईसोबत तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात पोहोचली. आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस या प्रकरणात अधिकचा तपास करत आहेत. मात्र, या घटनेनंतर मोठी खळबळ उडालीये. दोघे अमेरिकेत देखील कायमच भेटत असल्याचाही खुलासा झाला आहे.
