AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crime: घाटकोपरमध्ये भरदिवसा सराफा दुकानावर दरोडा, गोळीबार, धारदार शस्त्राने हल्ला; मुंबई हादरली

Robbery on Jewellery Shop: घाटकोपरमध्ये भरदिवसा चोरट्यांनी दरोडा टाकला आहे. अमृतनगर सर्कल येथील दर्शन ज्वेलर्सवर हा दरोडा टाकण्यात आला आहे. या दरोडेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी दुकान मालकावर धारदार शस्त्राने हल्ला केला. तसेच दुकानाबाहेर दहशत माजवण्यासाठी गोळीबार देखील केला आहे.

Crime: घाटकोपरमध्ये भरदिवसा सराफा दुकानावर दरोडा, गोळीबार, धारदार शस्त्राने हल्ला; मुंबई हादरली
Ghatkopar Crime
| Updated on: Oct 15, 2025 | 7:12 PM
Share

मुंबईतील घाटकोपरमध्ये भरदिवसा चोरट्यांनी दरोडा टाकला आहे. अमृतनगर सर्कल येथील दर्शन ज्वेलर्सवर हा दरोडा टाकण्यात आला आहे. या दरोडेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी दुकान मालकावर धारदार शस्त्राने हल्ला केला. तसेच दुकानाबाहेर दहशत माजवण्यासाठी गोळीबार देखील केला आहे. या घटनेने घाटकोपर परिसर हादरला आहे. या घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

दुकान मालकावर हल्ला

समोर आलेल्या माहितीनुसार तीन दरोडेखोर सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान दर्शन ज्वेलर्स मध्ये घुसले. त्यांनी दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. काही दागिने लुटले, मात्र दुकानचे मालक दर्शन मिटकरी यांनी विरोध केला. त्यामुळे दरोडेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले आणि बाहेर पळाले. तिघांपैकी दोन जण दुचाकी वर पळून गेले तर एक जण हातात बंदूक घेऊन पळत निघाला.

दहशत माजवण्यासाठी हवेत गोळीबार

तिसऱ्या दरोडेखोराने नागरिकांना भीती दाखविण्यासाठी आपल्या बंदुकीतून हवेत दोन गोळ्या झाडल्या आणि इंदिरा नगरच्या डोंगरावर पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक टीम, गुन्हे शाखा, वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. भरदिवसा अशा प्रकारचा दरोडा आणि गोळीबार होतो, त्यामुळे या भागात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेमुळे परिसरात आता भीतीचं वातावरण पसरलं आहे.

आरोपींचा शोध घेण्यासाठी 6 पथकं तयार

या घटनेत दर्शन मिटकरी हे जखमी झाले आहेत, त्यांच्यावर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीसांनी या घटनेची गंभीर दखल घेत ताबडतोब गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी या दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी सहा विशेष तपास पथकं तयार केली आहेत. सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचे काम करत आहेत. याबाबत बोलतान पोलीस अधिकारी म्हणाले की, ‘ही घटना अत्यंत गंभीर असून आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल. आम्ही पुरावे गोळा करत आहोत. त्याच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जाईल.’

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.