मुंबई देशाच्या सर्वात १० अस्वच्छ शहरात सामील, यादी पाहा
देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही अस्वच्छतेच्या बाबतीत देशातील सर्वात दहा अस्वच्छ शहरात गणली जात असल्याचे स्वच्छता सर्वेक्षणातून उघड झाले आहे.

मुंबई: स्वच्छता सर्वेक्षण २०२४-२५ चा अहवालात स्वच्छतेच्या आधारावर भारतातील शहरांची रॅकींग जाहीर झाली आहे. यात मुंबई सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. दहा लाखाहून अधिक लोकसंख्येच्या सर्वात अस्वच्छ शहरात मुंबई ३३ व्या स्थानी आली आहे. मुंबईने सर्वात अस्वच्छ शहराच्या यादीत दिल्लीलाही मागे टाकले आहे. राजधानी दिल्लीचा क्रमांक ३१ वा आला आहे.
सर्वेक्षणात मदुरई यादीत सर्वात खाली ४० व्या क्रमांकावर आहे. त्यानंतर लुधियाना ( ३९), चेन्नई ( ३८), रांची (३७), बंगळुरु (३६),धनबाद (३५) आणि फरीदाबाद (३४) यांचा समावेश आहे. श्रीनगर हे शहर मुंबईच्यावर ३२ व्या क्रमांकावर आले आहे तर दिल्ली ३१ व्या क्रमांकावर आहे.
सर्वात स्वच्छ भारतीय शहरांची यादी
बातमीनुसार गजरातचे अहमदाबाद हे शहर स्वच्छतेच्या बाबतीत क्रमांक १ वर आहे.त्यानंतर भोपाळ, लखनऊ, जयपूर, जबलपूर ही ५ शहरे टॉपवर आहेत. ग्रेटर हैदराबाद, पिंपरी-चिंचवड, पुणे, GVMC विशाखापत्तनम, आगरा सारखी अन्य शहरे देखील टॉपच्या स्थानावर आहेत.
रँकिंग कशी तयार केली ?
स्वच्छता सर्वेक्षण २०२४-२०२५ द्वारा टुल किटमध्ये रँकींगचे अनेक पॅरामीटर निश्चित केले गेले. त्यात साफसफाई, सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट, सॅनिटेशन, वापर होणाऱ्या पाण्याचे नियोजन, डिस्लजिंग सर्व्हीसेसचे मशिनीकरण यांचा समावेश होता. असेसमेंटमध्ये निवासी आणि कमर्शियल विभाग, सार्वजनिक जागा, शाळा, झोपडपट्ट्या, पाण्याचे स्रोत आणि टुरिस्ट जागेचा समावेश केला गेला होता.
मुंबईकरांची सोशल मीडियावर तक्रार
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर मुंबईकरांच्या पोस्ट पडलेल्या आहेत. त्यात कचरा साचणे, खड्डे आणि पाणी तुंबण्याच्या समस्यांना वाचा फोडून चीड व्यक्त करण्यात आली आहे. उच्चभ्रू परिसरातही हेच हाल आहेत. मालाड येथील एका रहिवाशाने त्याच्या इमारतीचे टॉयलेटचे पाणी रस्त्यावर आल्याने दुर्गंधी पसरल्याची तक्रार केली आहे.
कचरा देशातील गंभीर समस्या – किरण मझुमदार-शॉ
बायोकॉनचे अध्यक्ष किरण मझुमदार शॉ यांनी देखील कचरा व्यवस्थापन ही एक गंभीर समस्या असल्याचे म्हटले आहे. मुंबई, दिल्ली आणि बंगळुरु सारख्या मोठ्या शहरातील महापालिकाही या कचरा समस्येवर उत्तर शोधू शकलेली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. इंदूर आणि सुरत सारख्या शहरांनी मात्र कचऱ्याच्या समस्येचा योग्य प्रकारे निपटारा केला आहे.परंतू मुंबई, दिल्ली, बंगळुरु सारख्या मेट्रो शहरातही अजूनही वेस्ट डिस्पोजल सिस्टीमची समस्या कायम आहे.
