AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! 7 मे रोजी मुंबई विमानतळ बंद, 6 तासांसाठी…महत्त्वाची माहिती समोर

विमानतळ प्रशासनाच्या माहितीनुसार विमानतळावरील 09/27 आणि 14/32 रनवेवर दुरुस्तीचे हे काम केले जाईल. प्रवासी तसेच, विमानातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विमानतळ दुरुस्तीचे हे काम खूप गरजेचे आहे, असे प्रशासनाने सांगितले आहे. विमानतळाच्या दुरुस्तीचे नियोजन गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे.

मोठी बातमी! 7 मे रोजी मुंबई विमानतळ बंद, 6 तासांसाठी...महत्त्वाची माहिती समोर
mumbai airport will be closedImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 06, 2026 | 5:40 PM
Share

मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे. या शहरात रोज हजारो लोक येतात आणि शहराच्या बाहेर रोज हजारो लोक जातात. या शहरात विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोज शेकडो विमानांचे उड्डाण होते. हे विमानतळ एक दिवसजरी बंद राहिले तर प्रवाशांची मोठी अडचण होते. दरम्यान, आता हे विमानतळ 7 मे रोजी काही तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. या दिवशी विमानतळावरून एकाही विमानाचे उड्डाण होणार नाही.

विमानतळ बंद, नेमके कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार येत्या 7 मे रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ काही तस बंद असणार आहे. 7 मे रोजी सकाळी 11 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत म्हणजेच एकूण सहा तासांसाठी हे विमानतळ बंद असेल. या विमानाचे दोन्ही रनवे बंद असतील. पावसाळा सुरू होण्याआधी या पाच तासांत विमानतळाच्या डागडुजीचे काम केले जाणार आहे. या सहा तासांत कोणत्याही विमानाचे टेकऑफ होणार नाही. तसेच कोणतेही विमान या विमातळावर उतरणार नाही.

सहा महिन्यांपूर्वीच दिली होती माहिती

विमानतळ प्रशासनाच्या माहितीनुसार विमानतळावरील 09/27 आणि 14/32 रनवेवर दुरुस्तीचे हे काम केले जाईल. प्रवासी तसेच, विमानातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विमानतळ दुरुस्तीचे हे काम खूप गरजेचे आहे, असे प्रशासनाने सांगितले आहे. विमानतळाच्या दुरुस्तीचे नियोजन गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. म्हणजेच सहा महिन्यांपूर्वीच देशातली तसेच जगभरातील एअरलाईन्सना 7 मे 2026 रोजी विमानतळाच्या डागडुजीचे काम केले जाईल, असे सांगण्यात आले होते. ऐनवेळी प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून सर्व विमानवाहतूक कंपन्यांना या कामाची पूर्वसूचना देण्यात आली होती. नियोजनानुसार आता हे विमानतळ 6 तासांसाठी बंद असेल. दरम्यान, या सहा तासांत डागडुगीचे काम युद्धपातळीवर केले जाईल. आधुनिक यंत्र तसेच कुशल कामगार यांच्या मदतीने हे काम केले जाणार आहे. भविष्यात विमान प्रवासात कोणताही धोका निर्माण होऊ नये, म्हणून हे काम केले जात आहे.

Follow Us
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान