Mumbai Local Updates : दिवाळीपूर्वीच मुंबईकरांचा खोळंबा ! मध्य रेल्वेवर तब्बल 30 तासांचा मेगाब्लॉक
मुंबईकरांना दिवाळीपूर्वी मोठा फटका! मध्य रेल्वेने 30 तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. कर्जत-नेरळ आणि कर्जत-खोपोली मार्गावरील लोकल सेवा बंद राहणार आहेत, तर पुणे-मुंबई मार्गावरील अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द किंवा वळवण्यात आल्या आहेत. यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागेल. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना वेळापत्रक तपासण्याचे आवाहन केले आहे.

दिवाळीचा सण अवघ्या आठवड्याभरावर आला असून मुंबईकरांचा सणासाठी खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मात्र याच मुंबईकरांना आता मोठा त्रास सहन करावा लागून शकतो , कारण मुंबईकरांची लाईफलाइन असलेल्या मध्य रेल्वेवर आज तब्बल 30 तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या मेगा ब्लॉकमुळे कर्जत ते नेरळ आणि कर्जत ते खोपोली सर्व लोकल बंद राहणार आहेत. त्यामुळे दिवाळीच्या आधीच्या वीकेंडलाच मुंबईकरांचा खोळंबा होणार असून मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.
मध्य रेल्वेवर आज तीस तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येईल. या काळात कर्जत ते नेरळ आणि कर्जत ते खोपोली सर्व लोकल बंद राहतील. तसेच नेरळ पासून सीएसएमटीच्या दिशेने जाणारी लोकसेवादेखील उशिराने धावणार आहे. उद्या, म्हणजेच रविवारी, 12 ऑक्टोबररोजी ब्लॉक नंतर संध्याकाळी 7 वाजून 43 मिनिटांनी कर्जत ते सीएसएमटी ही पहिली लोकल कर्जत येथून सुटेल.
मेगा ब्लॉकचा पुणे-मुंबई मार्गावर मोठा परिणाम !
मेगा ब्लॉकचा पुणे-मुंबई मार्गावर मोठा परिणाम होणार आहे. कर्जत यार्ड पुनर्रचना कामासाठी 11 ते 14 ऑक्टोबरदरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. चार दिवस मुंबई-पुणे मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तसेच शॉर्ट टर्मिनेट आणि डायव्हर्टही करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रगती, डेक्कन क्वीन, इंद्रायणी, इंटरसिटीसह वंदे भारत एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे.
तसेच पळसधरी ते चौक विभागात ट्रॅफिक ब्लॉक — मेल, एक्सप्रेस आणि उपनगरी गाड्यांवर परिणाम होईल.
उपनगरी सेवा ठप्प – नेरळ ते कर्जत आणि कर्जत ते खोपोली लोकल सेवा रद्द!
कर्जत, खोपोली, नेरळ, बदलापूर आणि अंबरनाथ येथे शॉर्ट टर्मिनेशन आणि ओरिजिनेशन, त्यामुळे गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे. काही एक्सप्रेस गाड्या कल्याणमार्गे आणि काही दौंडमार्गे वळवण्यात आल्या आहेत. या कालावधीत प्रवास करण्यापूर्वी प्रवाशांनी रेल्वे वेळापत्रक तपासावे असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सुरक्षिततेसाठी देखभाल आवश्यक असल्याचे सांगत, प्रवाशांची गैरसोय झाल्यास दिलगीर आहोत, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले. यासंदर्भात मध्य रेल्वेने अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहेस अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी दिली आहे.
कोणत्या ट्रेन बंद ?
11 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.20 ते रविवार 12 ऑक्टोबर, सायं 6.20 वाजेपर्यंत 30 तासांचा मेगाब्लॉक
>> कर्जत ते नेरळ सर्व ट्रेन बंद
>> कर्जत ते खोपोली सर्व ट्रेन बंद
>> नेरळ ते CSMT लोकल सेवा सुरू राहणार
>> शनिवार, 11 ऑक्टोबर रोजी ब्लॉक पूर्वी शेवटची लोकल कर्जत ते CSMT सकाळी 11:19 ला कर्जतहून सुटेल. त्यानंतर या मार्गावरील लोकसेवा बंद होईल.
>> रविवार, 12 ऑक्टोबर रोजी ब्लॉक नंतरची पहिली लोकल कर्जत ते CSMT संध्याकाळी 7.43 ला कर्जतहून गुटेल.
>> सोमवार, 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.20 पासून दुपाटी 2.20 पर्यंत 3 तासांचा मेगाब्लॉक असल्यामुळे या दरम्यान सर्व ट्रेन बंद राहतील.
>> मंगळवार, 14 ऑक्टोबर रोजी पुन्हा सकाळी 11.20 पासून दुपारी 02.20 पर्यंत 3 तासाचा मेगा ब्लॉक असल्यामुळे या दरम्यान देखील सर्व ट्रेन बंद राहतील.
