AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुबार मतदार आला तर सकाळी 7 वाजताच त्याला फोडा… राज ठाकरे बरसले

आज मुंबईमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची सभा पार पडली, या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे, तसेच जर दुबार मतदार आला तर त्याला फोडून काढा असा घणाघातही यावेळी ठाकरे यांनी केला.

दुबार मतदार आला तर सकाळी 7 वाजताच त्याला फोडा... राज ठाकरे बरसले
राज ठाकरे Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 11, 2026 | 9:28 PM
Share

राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, प्रचाराला देखील वेग आला असून, आरोप -प्रत्यारोपाचं राजकारण रंगताना दिसत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची युती झाली आहे. आज मुंबईमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची सभा झाली, या सभेमध्ये बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ईव्हीएम आणि दुबार मतदानाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  दुबार मतदार आला तर सकाळी सात वाजताच त्याला फोडून काढा असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? 

यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तुम्हीच नसाल तुमचे अस्तित्व नसेल तर काय चाटायच्या आहेत महापालिका? आमच्या वचननाम्यात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, आम्ही उत्तम गोष्टी करू अरे पण त्यासाठी तुम्ही असले पाहिजे ना. तुमची काय किंमत करून ठेवली आहे? कोण महाराष्ट्रातील मराठी माणूस, पैसे फेकला की विकला जातो. ही बोली लावणारे कोण आमचेच, आमचेच लोकं त्यांचा उद्देश साध्य करण्यासाठी आमच्या लोकांना फोडत आहेत. ही निवडणूक मराठी माणसासाठी शेवटची आहे. आज चुकला तर कायमचा मुकला. आज ही शहरं त्यांच्या हातात गेली तर उद्या राजाने मारलं आणि पावसाने झोडलं तर तक्रार कुणाकडे करायची? त्यामुळे हे  सर्व सोडा, मराठी माणसासाठी एक व्हा, मुंबईसाठी एक व्हा, महाराष्ट्रासाठी एक व्हा, असं आव्हान यावेळी राज ठाकरे यांनी केलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, इतक्या वर्षाच्या तपश्चर्येने ही मुंबई मिळाली. १०७ हुतात्मे गेले. उद्या मुंबई गेल्यावर पुतळ्यांना काय अर्थ उरतो? पुतळे काय म्हणतील आमचा मराठी माणूस बेसावध राहिला. आम्हाला सत्ता मिळाली तर काय करू, सत्तेला लाथा आम्ही मारल्यात. या सत्ताधाऱ्यांना लाथ मारायच्या आहेत. बेसावध राहू नका,  ईव्हीएम मशीनवर लक्ष ठेवा. सहा वाजता मतदान केंद्रावर जा. आपल्यात वाद नाही, खरी लढाई त्यांच्याशी आहे. आपण भांडत राहावं हेच त्यांना पाहिजे. त्यांना हवं ते द्यायचं नाही, आपल्याला हवं ते करायचं आहे. बेसावध राहू नका, सतर्क राहा, दुबार मतदार तिकडे आला तर सकाळी ७ वाजताच फोडून काढा, असं यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...