AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र आणि मुंबईवर संकट आलं तर दोस्तीबिस्ती पाहणार नाही… त्या फोटोवरून राज ठाकरे गर्जले

महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, ठाण्याच्या सभेमध्ये बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. विविध मुद्दे उपस्थित करत त्यांनी सरकारच्या कोंडीचा प्रयत्न केला.

महाराष्ट्र आणि मुंबईवर संकट आलं तर दोस्तीबिस्ती पाहणार नाही... त्या फोटोवरून राज ठाकरे गर्जले
राज ठाकरे Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 12, 2026 | 9:10 PM
Share

मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, राजकीय पक्षांच्या सभा सुरू असून, आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगताना पहायला मिळत आहे. आज ठाण्यात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची संयुक्त प्रचार सभा सुरू आहे, या सभेत बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी  भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील त्यांनी यावेळी निशाण साधला. अण्णा मलाई यांनी मुंबई महाराष्ट्राची नाही अशा अर्थाचं विधान केलं होतं, त्याचा देखील राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात चांगलाच समाचार घेतला.

छगन भुजबळांना तुरुंगात टाकणारे हेच फडणवीस. त्यांना काय झालं माहीत नाही? बरा होता माणूस, आता आतापर्यंत बरा होता. ती रसमलाई आली होती, तो सांगतोय मुंबई आणि महाराष्ट्राचा संबंध नाही आणि फडणवीस म्हणतात तो असा बोलला नाही. त्याचा तो अर्थच होत नाही, मला वाटतं फडणवीसांना इंग्रजी कळतं, असा टोला यावेळी राज ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला.  पण खोटं बोलत राहायचं, यांना वाटतं खोट्याचं खरं करता येतं, नाही होणार आता. तो बोलतोय मुंबई महाराष्ट्राची नाही. फडणवीस म्हणतात तो असं बोललाच नाही. त्याचा अर्थ तसा होत नाही. किती खोटं बोलायचं काही मर्यादा आहे का नाही? कुणासाठी करत आहात? असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी यावेळी केला.

दरम्यान   काल अदानीचं प्रकरण काढलं. काय मिर्च्या झोंबल्या. माझा आणि अदानीचा फोटो दाखवला, बरं मग पुढे. माझ्या घरी अदानी येऊन गेले. रतन टाटा येऊन गेले. अंबानी येऊन गेले. घरी येऊन गेले म्हणून त्यांची पापं झाकायची का मी? मी काल जे दाखवलं ते इतकं भयानक आहे,  इतके भीषण आहे, ते दोन चार वर्षापूर्वीचा फोटो दाखवत आहेत. आता घरी आल्यावर काय त्यांना हाकलून देऊ. जेव्हा महाराष्ट्रावर मुंबई, ठाण्यावर संकट येईल तेव्हा राज ठाकरे दोस्ती बिस्ती बघणार नाही. अदानीशी दोस्ती करण्याचा तर विषयच नाही. मी इतका अडाणी नाही. काल जे सांगितलं त्याचं गांभीर्य समजून घ्या, असं यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल...
Girish Mahajan | गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल प्रकरणात मोठा खुलासा
ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये
ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुकांच्या लढ्याला..
Rajool Patil | वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुक यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा
शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत
Uddhav Thackeray | शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत; पोलिसांची धावपळ वाढली!
वांगचुकांशी संवाद टाळणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरेंचा संताप, म्हणाले...
Uddhav Thackeray | वांगचुकांशी संवाद टाळणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरेंचा संताप; पाकिस्तानचा दाखला देत घेरलं!
ठाकरेंचे किती आमदार संपर्कात? फुटीर खासदाराने दिली मोठी माहिती
ठाकरेंचे किती आमदार संपर्कात? फुटीर खासदाराने दिली मोठी माहिती
खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया...
खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया का पडल्या? त्या व्हिडीओने रोखल्या नजरा
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी... ठकारेंची सरकारवर टीका
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी...वांगचूक यांच्या आंदोनाला पाठिंबा देताना ठाकरेंची केंद्रावर सडकून टीका!
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल;
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आता उपचार...
हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश
Dombivli Hospital Case | हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश; पोलिसांचा ॲक्शन मोड!
दिल्लीत CJPचे आंदोलक आक्रमक; पोलिसांकडून लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?.

दिल्लीत CJPचे आंदोलक आक्रमक; पोलिसांकडून लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?

CJP Protest : संसदेकडे निघताना सोनम वांगचूक यांच्या पत्नीचं महत्वाचं विधान, गीतांजली आंग्मो उतरल्या मैदानात.

CJP Protest : संसदेकडे निघताना सोनम वांगचूक यांच्या पत्नीचं महत्वाचं विधान, गीतांजली आंग्मो उतरल्या मैदानात

Rohit Sharma Century :  चेहऱ्यावर हसू पण डोळ्यांत अश्रूंची दाटी.. रोहितने शतक ठोकताच रितीकाची रिॲक्शन व्हायरल.

Rohit Sharma Century : चेहऱ्यावर हसू पण डोळ्यांत अश्रूंची दाटी.. रोहितने शतक ठोकताच रितीकाची रिॲक्शन व्हायरल

मी आमरण उपोषण मागे घेण्यास आजच तयार, पण.. सोनम वांगचुक यांनी थेट ठेवल्या या 3 अटी...

मी आमरण उपोषण मागे घेण्यास आजच तयार, पण.. सोनम वांगचुक यांनी थेट ठेवल्या या 3 अटी..

झुरळं फार जास्त खंबीर निघाली.. संजय राऊत यांची सरकारवर थेट टीका...

झुरळं फार जास्त खंबीर निघाली.. संजय राऊत यांची सरकारवर थेट टीका..

CJP च्या आंदोलनामुळे दिल्लीत हाय अलर्ट; संपूर्ण शहरात 5000 सुरक्षा जवान तैनात, प्रतिबंधात्मक आदेशही लागू.

CJP च्या आंदोलनामुळे दिल्लीत हाय अलर्ट; संपूर्ण शहरात 5000 सुरक्षा जवान तैनात, प्रतिबंधात्मक आदेशही लागू