AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टाईम्स स्वेअरवर झळकला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो; पाहा…

CM Eknath Shinde photo appeared on Times Square : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झळकले न्युयॅार्कमध्ये; टाईम्स स्क्वेअरवर झळकणारे महाराष्ट्रातील पहिले नेते

टाईम्स स्वेअरवर झळकला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो; पाहा...
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Aug 05, 2023 | 12:26 PM
Share

मुंबई | 05 ऑगस्ट 2023 : अमेरिकेच्या न्युयॉर्क शहरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो झळकले आहेत. न्युयॅार्कमधल्या टाईम स्क्वेअरवर एकनाथ शिंदे यांचा फोटो झळकला आहे. न्युयॅार्क शहरातील टाईम स्क्वेअरवर झळकणारे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील पहिले राजकारणी आहेत.

टाईम्स स्क्वेअरवर कोणते फोटो झळकले?

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी एक जुलैला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशाचे फोटो न्युयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच खासदार श्रीकांत शिंदे आणि राहुल कनाल या तिघांचे फोटो टाईम्स स्क्वेअरवर झळकले आहेत. राहुल कनाल यांच्यावतीनं हा उपक्रम राबवण्यात आला होता.

महाराष्ट्रातील पहिले नेते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे न्युयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकणारे पहिले नेते ठरले आहेत. शिवसैनिकांकडून यावर आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य तसेच शिर्डी देवस्थानचे विश्वस्त राहुल कनाल यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी कनाल यांचं शिवसेनेत स्वागत केलं होतं. याबाबत एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं होतं. याच पक्षप्रवेशाचे फोटो टाईम्स स्क्वेअरवर झळकले आहेत.

उध्दव गटाच्या युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य आणि शिर्डी देवस्थानचे विश्वस्त राहुल कनाल यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री मा. ना श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या मुख्य उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्या समवेत शेकडो कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री महोदयांनी राहुल कनाल यांचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत करून त्यांना पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित होतो, असं म्हणत खासदार श्रीकांत शिंदे यांनी राहुल कनाल यांचं स्वागत केलं होतं.

Follow Us
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी