Weather Alert : राज्यासाठी पुढचे 3-4 तास महत्त्वाचे, हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना इशारा

Weather Alert : राज्यासाठी पुढचे 3-4 तास महत्त्वाचे, हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांना इशारा

मुंबईत पुढचे 3 ते 4 तास असाच पाऊस राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर राज्यात उत्तर कोकणातही ढगाळ वातावरण आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Dec 14, 2020 | 9:48 AM

मुंबई : मुंबई, नवी मुंबईसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये रविवारी रात्रीपासूनच जोरदार पावसाने (Heavy rain) हजेरी लावली. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे आजही राज्याभर पाऊस कोसळणार असून अनेक ठिकाणी थंडीचा पारा वाढण्याची शक्यता आहे. आजही सकाळपासूनच मुंबई (Mumabi), ठाणे (Thane), नवी मुंबई (Navi Mumbai), पालघर (Palghar), वसई-विरार (Vasai-Virar), नाशिक (Nashik) अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. (mumbai rain Weather Alert maharashtra rain todays wether forecast news )

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत पुढचे 3 ते 4 तास असाच पाऊस राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर राज्यात उत्तर कोकणातही ढगाळ वातावरण आहे. पुढच्या 3-4 तासांमध्ये इथं हलका ते मध्यम पाऊस पडेल अशी माहिती मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी दिली आहे. यासंबंधी त्यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. इतकंच नाही तर पुढच्या 24 तासांत मुंबई, पुण्यासह नागपूर परिसरात हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

मुंबईमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण झालं असून अनेक उपनगरांमध्ये हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. नवी मुंबईमध्येही रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारी रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली. यामुळे सकाळी कामाला जाणाऱ्यांना कोरोनाच्या संकटात आणखी त्रास सहन करावा लागला. मुंबईतही वसई-विरार नालासोपाऱ्यात सलग तिसऱ्या दिवशी रिमझिम पावसाच्या सरी सुरूच आहे.

आभाळ पूर्णपणे भरलेलं असून हावेत प्रचंड गारवा पसरला आहे. भिवंडीतही पहाटेपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. मंडई बाजार पेठेत सकाळीपासून पाऊस पडत असल्यामुळे सगळीकडे चिखल झाला आहे. खरंतर, या अवकाळी रिमझिम पावसाने साथीचे आजार बाळावण्याची शक्यता वाढली आहे.

नवी मुंबई, पनवेल पाऊस आणि ढगाळ वातावरण

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यातील हवानात अचानक बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. पनवेल, नवी मुंबईत ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसाच्या सरींना सुरुवात झाली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून पावसाच्या रिमझिम सरी सुरू आहेत. तर आता पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळतं. खरंतर, हवामान विभागानेही 9 ते 14 डिसेंबर या कालावधीत ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता वर्तविली होती.

पालघरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

पालघर जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली असून आजही सकाळी 7 वाजल्यापासून पालघर शहरात पावसाची रिपरिप सुरूच आहे. काही भागात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे हवेत गारवा पसरला आहे. मात्र, या अवकाळी पावसाचा फटका दुबार पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना बसलेला पाहायला मिळतो.

नवी मुंबई, पनवेल पाऊस आणि ढगाळ वातावरण

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यातील हवानात अचानक बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. पनवेल, नवी मुंबईत ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसाच्या सरींना सुरुवात झाली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून पावसाच्या रिमझिम सरी सुरू आहेत. तर आता पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळतं. खरंतर, हवामान विभागानेही 9 ते 14 डिसेंबर या कालावधीत ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता वर्तविली होती.

पालघरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

पालघर जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली असून आजही सकाळी 7 वाजल्यापासून पालघर शहरात पावसाची रिपरिप सुरूच आहे. काही भागात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे हवेत गारवा पसरला आहे. मात्र, या अवकाळी पावसाचा फटका दुबार पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना बसलेला पाहायला मिळतो. (mumbai rain Weather Alert maharashtra rain todays wether forecast news)

इतर बातम्या – 

मुंबईसह राज्यभर जोरदार पावसाला सुरुवात, पुढच्या 24 तासांसाठी हवामान खात्याकडून इशारा

महाराष्ट्रात आता पुन्हा-पुन्हा वादळं, पाऊस येणार? संशोधनात धक्कादायक खुलासा

(mumbai rain Weather Alert maharashtra rain todays wether forecast news)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें