AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बापरे…! मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलच्या मसाला डोशात आढळला मेलेला उंदीर, ग्राहकाला मळमळ अन् उलट्या

rat found in dosa : मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलच्या मसाला डोशात मेलेला उंदीर आढळल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारानंतर ग्राहकाला मळमळ आणि उलट्या झाल्या. या घटनेनंतर अन्नाच्या गुणवत्तेवरून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

बापरे...! मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलच्या मसाला डोशात आढळला मेलेला उंदीर, ग्राहकाला मळमळ अन् उलट्या
borivali newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 29, 2026 | 6:53 PM
Share

मुंबईतील छोटे हॉटेल असो वा प्रसिद्ध हॉटेल….अन्नाच्या स्वच्छेतबाबत कोणीही फारसे नियम पाळत नसल्याचे अनेकदा उघड झालं आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हॉटेलवर कारवाईचा धडाका सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एफडीएकडून अनेक हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांत काही पदार्थात मेलेलं झुरळ आढळल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यानंतर एफडीएने संबंधित हॉटेल सील देखील केले होते. आता मुंबईतून आणखी एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. आता चक्क मसाला डोशात मेलेला उंदीर आढळल्याची घटना उघडकीस आली आहे.  या घटनेनंतर हॉटेल मालकाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

मुंबईच्या बोरिवली पश्चिम परिसरातून अन्नाच्या स्वच्छतेबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बोरिवली स्टेशनजवळ एल.टी. रोडवरील राधाकृष्ण हॉटेलमध्ये खाद्यपदार्थात मृत उंदीर आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, अमित त्रिवेदी हे आपल्या दोन भावांसह आणि मुलासोबत या हॉटेलमध्ये दक्षिण भारतीय पदार्थ खाण्यासाठी गेले होते. त्यांनी म्हैसूर मसाला डोसा ऑर्डर केला. डोशाचे काही घास खाल्ल्यानंतर त्यामध्ये छोटा मृत उंदीर आढळल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा प्रकार लक्षात येताच अमित त्रिवेदी यांना धक्का बसला. त्यांना उलट्या सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्यांनी बोरिवली पोलिसांशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली.  या घटनेमुळे हॉटेलमधील स्वच्छता आणि अन्नाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत आता या प्रकरणात अन्न आणि औषध प्रशासन किंवा महापालिका प्रशासनाकडून तपासणी आणि कारवाई होते का, याकडे लक्ष लागलं आहे.

चायनीज रेस्टॉरंटमध्येही उंदरांचा सुळसुळाट  

बोरीवली पश्चिम आयसी कॉलनी परिसरातील प्रसिद्ध चायनीज रेस्टॉरंटमध्ये उंदरांचा सुळसुळाट असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हॉटेलमध्ये खाली नागरिक विश्वासाने अन्न सेवन करत होते. त्यावेळी वरती 5 ते 6 उंदीर फिरतानाचा व्हिडिओ मनसेचे उपविभाग अध्यक्ष किरण नकाशे यांनी उघडकीस आणलाय.  या गंभीर प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा आणि अन्न सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अस्वच्छ वातावरणामुळे अन्न विषबाधा किंवा प्लेगसारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण झालाय.

याप्रकरणी मनसे उपविभाग अध्यक्ष किरण नकाशे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला इशारा दिला आहे. नागरिक कष्टाचे पैसे देऊन हॉटेलमध्ये चांगल्या अन्नासाठी जातात. परंतु किचनमध्ये जो अस्वच्छतेचा कारभार सुरू आहे, तो ग्राहकांच्या जीवाशी खेळ आहे या हॉटेलची तात्काळ FDA आणि पालिकेच्या आरोग्य विभागाने पाहणी करून सील ठोकले पाहिजे, प्रशासनाने कारवाई केली नाही, तर मनसे स्टाईलने आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला आहे. याप्रकरणी किरण नकाशे यांनी FDA आणि BMC R / Central वॉर्ड आरोग्य विभागाकडे तक्रार नोंदवून परवाना रद्द करण्याची आणि हॉटेल बंद करण्याची मागणी केली आहे.

Follow Us
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
Aditi Tatkare On NCP Merger : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती तटकरेंचा थेट सवाल
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...
Nagpur Students Meet Amit Thackeray : नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं प्रकरण काय?
मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं....
Dharashiv : मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं; तुळजापूर तालुक्यात खळबळ
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
Rahul Gandhi : माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाणांचंही मोठं विधान, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
NCP Merger : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
NCP : सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप
भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा...
Raj Thackeray On BJP : भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा, Gen-Z आंदोलनाचा उल्लेख करत सत्तांतराचे संकेत?
तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला खिंडार; राष्ट्रवादीचा तो नेता..
NCP Politics : सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला मोठा खिंडार; राष्ट्रवादीचा तो नेता शिंदेसेनेत प्रवेश करणार
दिवाळीत महागाईचा डबल झटका, CNG दरात एवढ्या रुपयाची वाढ; वाहनांच्या....
CNG Crisis : दिवाळीत महागाईचा डबल झटका, CNG दरात एवढ्या रुपयाची वाढ; वाहनांच्या लांबच लांब रांगा