AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र; म्हणाले, ‘त्या’ नेत्याला आधी बाहेर काढा…

Uddhav Thackeray Meet Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा भेट झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी 'त्या' नेत्याला आधी बाहेर काढा..., असं म्हटलं. पण तो नेता नेमका कोण होता? कुणाला पाहून उद्धव ठाकरे यांनी हे विधान केलं. वाचा सविस्तर...

देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र; म्हणाले, 'त्या' नेत्याला आधी बाहेर काढा...
देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेImage Credit source: PTI
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jun 27, 2024 | 1:48 PM
Share

आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. याच अधिवेशनादरम्यान राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आणणारी घटना घडली. एकेकाळचे जवळचे मित्र आणि आताचे राजकीय प्रतिस्पर्धी असणारे दोन नेते एकत्र आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. विधिमंडळात जात असताना या दोघांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला आहे. प्रविण दरेकर देखील यावेळी लिफ्टमध्ये जाणार इतक्यात उद्धव ठाकरे यांनी आधी दरेकरांना बाहेर काढा, असं विधान केलं. आता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आले तर चर्चा तर होणारच… उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या या ‘लिफ्ट’ भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.

फडणवीस- ठाकरे भेटीदरम्यान नेमकं काय घडलं?

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर सभागृहात जाण्यासाठी विधिमंडळातील लिफ्टजवळ उभे होते. याचवेळी त्या लिफ्टजवळ माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर पोहोचले. मग हे सगळे नेते एकत्र लिफ्टने सभागृहात जाण्यासाठी निघाले. उद्धव ठाकरे- देवेंद्र फडणवीस हे लिफ्टमध्ये गेले. इतक्यात भाजपचे नेते प्रविण दरेकर हे त्या लिफ्टमध्ये जाऊ लागले. मात्र इतक्यात ‘याला आधी बाहेर काढा’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.

प्रविण दरेकर काय म्हणाले?

याला आधी बाहेर काढा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटल्यावर प्रविण दरेकरांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली. देवेंद्रजी आणि उद्धवजी, तुम्ही दोघं एकत्र जाणार असाल. तर मी बाहेर जातो, असं प्रविण दरेकर म्हणाले. पण तुमच्या दोघांमधला संवाद मी बाहेर सांगणार नाही, असंही प्रविण दरेकर म्हणाले. उद्धव ठाकरे तरिही त्यांच्या विधानावर ठाम होते. आधी तू बाहेर जा, असं उद्धव ठाकरे प्रविण दरेकरांना म्हणाले आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.

Follow Us
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर