
Pakistani Sajid Mir: मुंबईवरील 26/11 हा केवळ दहशतवादी हल्ला नव्हता. तर भारताची सुरक्षा, हिम्मत आणि त्वरीत कारवाईची मोठी परीक्षा होती. 26 नोव्हेंबर 2008 रोजी रात्री हा दहशतवादी हल्ला सुरू झाला. पुढील 60–65 तास संपूर्ण शहर दहशतवाद्यांनी वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. समुद्राच्या मार्गाने पाकिस्तानातून 10 दहशतवादी आले होते. दहशतवाद्यांनी एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला करून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा सामना भारताच्या वीर, धडाकेबाज आणि जिगारा असलेल्या अधिकाऱ्यांशी अजून झालेला नव्हता. तितक्या काळात त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स(CST) ताज हॉटेल, ओबेरॉय-ट्रायडेंट, लीओपोल्ड कॅफे आणि नरीमन हाऊस पर्यंत, प्रत्येक ठिकाणी गोळ्यांचे आवाज, धमाके आणि दहशत होती. या हल्ल्यात 166 निष्पापांना जीव गमवावा लागला. तर 300 हून अधिक जण गंभीर जखमी झाले. पोलीस, मरीन कमांडो आणि NSG यांनी पराक्रम दाखवला. शहीद तुकाराम ओंबळे यांनी जीव पणाला लावला आणि अजमल कसाब या पाकिस्तानच्या दहशतवाद्याला पकडून दिले. तर इतरांचा जवानांनी खात्मा केला. 26 ते 29 नोव्हेंबर या काळात...